Ambati Rayudu On Virat Kohli: 'ऑरेंज कॅप IPL ची ट्रॉफी जिंकून देत नाही..' अंबाती रायडूचा नाव न घेताच विराटला टोमणा

Ambati Rayudu Statement News In Marathi: कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या विजयानंतर अंबाती रायडूने नाव न घेताच विराटला टोमणा मारला आहे.
Ambati Rayudu On Virat Kohli: 'ऑरेंज कॅप IPL ची ट्रॉफी जिंकून देत नाही..' अंबाती रायडूचा नाव न घेताच विराटला टोमणा
ambati rayudu on virat kohli saam tv

भारताचा माजी खेळाडू अंबाती रायडू सध्या आपल्या स्पष्ट वक्तव्यांमुळे जोरदार चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा पराभव केला. या पराभवानंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर जोरदार टिका केली होती. तो म्हणाला होता की, फक्त सीएसकेला हरवलं म्हणजे आयपीएल जिंकली असं होत नाही. आता त्याने पुन्हा एकदा नाव न घेता विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं. या विजयानंतर त्याने नाव न घेताच विराट कोहलीवर टिका केली आहे. फायनल सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सवर कोलकाताच्या या हंगामातील कामगिरीची चर्चा सुरु होती. त्यावेळी अंबाती रायडू म्हणाला की, ' असेच संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकतात. वर्षानुवर्षे हेच सुरु आहे,ऑरेंज कॅप तुम्हाला आयपीएलची ट्रॉफी जिंकून देऊ शकत नाही. संघासाठी तु्म्ही योगदान द्यायला हवं.'

Ambati Rayudu On Virat Kohli: 'ऑरेंज कॅप IPL ची ट्रॉफी जिंकून देत नाही..' अंबाती रायडूचा नाव न घेताच विराटला टोमणा
IPL 2024 SRH Vs KKR Final: हैदराबादचा पराभवही झाला अन् नावावर लाजीरवाणा विक्रमही राहिला; काय आहे नकोसा रेकॉर्ड?

विराटने पटकावली ऑरेंज कॅप

आयपीएल २०२४ स्पर्धेत विराट कोहली ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला हा पुरस्कार दिला जातो. विराट कोहलीने या हंगामात शानदार फलंदाजी करत ७४१ धावा केल्या. विराटने २०१६ नंतर पुन्हा एकदा ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे. २०१६ मध्ये त्याने विक्रमी ९७३ धावा केल्या होत्या.

विराट कोहलीला वगळलं तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील इतर कुठल्याही फलंदाजाला ५०० धावा देखील करता आलेल्या नाहीत. या स्पर्धेतील १७ हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील ४ फलंदाजांनी ऑरेंज कॅप पटकावली आहे. मात्र या संघाला एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

Ambati Rayudu On Virat Kohli: 'ऑरेंज कॅप IPL ची ट्रॉफी जिंकून देत नाही..' अंबाती रायडूचा नाव न घेताच विराटला टोमणा
KKR vs SRH, IPL 2024 Final: दारुण पराभवानंतर पॅट कमिन्स भावुक! सामन्यानंतर सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला आयपीएल २०२४ स्पर्धेत हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. पहिल्या टप्प्यात हा संघ सर्वात शेवटी होता. मात्र दुसऱ्या टप्प्यात सलग ६ सामने जिंकून या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. मात्र एलिमिनेटरच्या सामन्यात या संघाला राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्कारावा लागला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com