ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आफ्रिकन देशातील युगांडाचा संघ पहिल्यांदाच T20 विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे असून या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
T20 विश्वचषकात युगांडाच्या संघात या वर्षी जुमा मियागीचाही समावेश करण्यात आलेला आहे. जुमा हा उजव्या हाताचा सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो.
युगांडाची राजधानी कंपालामधील ६० टक्के नागरिक झोपडपट्टीत राहणारे आहेत. जुमाही याच झोपडपट्टीत वाढला असून, आपल्या कुटुंबासह तो तिथेच राहतो.
कंपालामधील सर्वसामान्य जनता फुटबॉलप्रेमी आहे मात्र जुमा मीयागीमुळे तेथील नागरिक क्रिकेट पाहायला लागले.
जुमाचे वय हे अवघे 21 वर्ष आहे. जुमा याआधी युगांडाच्या १९ वर्षाखालील संघातून दोन वर्ष खेळला आहे.
जुमा मीयागीने आतापर्यंत 21 T20 सामन्यामध्ये तब्बल 34 विकेट घेतल्या आहेत.
मीयागी सोबत T20 मध्ये सहभागी झालेले सायमन सेसाजी आणि राखीव खेळाडू इनोसंट म्वेबाजेही याच झोपडपट्टीत राहतात. जिथे अजूनही शुद्ध पाणी आणि आरोग्याच्या मुलभूत सेवा नाहीत.
युगांडाच्या गटात अफगाणिस्तान तसेच न्यूझीलंड, वेस्टइंडिज आणि पापुआ न्यू गिनीचा समावेश आहे.
येत्या 3 जून रोजी विश्वचषकातील युगांडाचा पहिला सामना हा अफगाणिस्तानसोबत होणार आहे.