Yuzvendra Chahal: फक्त IPL च नाही, तर टीम इंडियाकडूनही घेतल्यात सर्वात जास्त T20 विकेट्, पण खेळला नाही एकही WC मॅच

Yuzvendra Chahal Record News: राजस्थान रॉयल्स संघातील स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलने आयपीएल स्पर्धेत मोठा कारनामा करुन दाखवला आहे. त्याने जयपुरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात त्याने इतिहासाला गवसणी घातली आहे.
फक्त IPL च नाही, तर टीम इंडियाकडूनही घेतल्यात सर्वात जास्त T20 विकेट्, पण खेळला नाही एकही WC मॅच
yuzvendra chahal has most wickets for team india in t20i and most wickets in ipl 2024twitter
Published On

राजस्थान रॉयल्स संघातील स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलने आयपीएल स्पर्धेत मोठा कारनामा करुन दाखवला आहे. त्याने जयपुरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात २०० गडी बाद करण्याचा कारनामा करुन दाखवला आहे. हा कारनामा त्याने मुंबई इंडियन्य संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात करुन दाखवला आहे. दरम्यान या स्पर्धेच्या इतिहासात २०० गडी बाद करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. (Yuzvendra Chahal Completed 200 wickets in ipl)

नबीला बाद करताच रचला इतिहास..

चहलने आपल्या स्पेलमधील दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद नबीला बाद केलं. चहलने त्याला झेलबाद करत माघारी धाडलं. दरम्यान नबी हा चहलचा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील २०० वा बळी ठरला आहे. त्याच्या नावे आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याची नोंद आहे. दरम्यान कुठलाही गोलंदाज २०० गडी बाद करण्याचा पल्ला गाठु शकलेला नाही. हा कारनामा त्याने आपल्या १५३ व्या सामन्यात करुन दाखवला आहे. त्यानंतर ड्वेन ब्रावो या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने १८३ गडी बाद केले आहेत. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या पियुष चावल्याच्या नावे १८१ गडी बाद करण्याची नोंद आहे.

फक्त IPL च नाही, तर टीम इंडियाकडूनही घेतल्यात सर्वात जास्त T20 विकेट्, पण खेळला नाही एकही WC मॅच
IPL 2024 Points Table: राजस्थानचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा! मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं; पाहा पॉईंट्स टेबल

भारतीय संघात केव्हा स्थान मिळणार?

युजवेंद्र चहल हा केवळ आयपीएल स्पर्धेतील नव्हे तर भारतीय संघातील देखील सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. त्याने भारतीय संघासाठी गोलंदाजी करताना ८० सामन्यांमध्ये ९६ गडी बाद केले आहेत. असं असलं तरीदेखील त्याला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. तो २०२३ मध्ये वेस्टइंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यात आपला शेवटचा टी-२० सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळवता आलेलं नाही. आता आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

फक्त IPL च नाही, तर टीम इंडियाकडूनही घेतल्यात सर्वात जास्त T20 विकेट्, पण खेळला नाही एकही WC मॅच
IPL Playoffs Scenario: 8 पैकी 5 सामने गमावले, अजूनही मुंबईला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! असं असेल समीकरण

असा राहिलाय प्रवास...

युजवेंद्र चहलने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्स संघातून केली होती. त्यानंतर २०१४ मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाने आपल्या संघात स्थान दिलं. त्याने २०१४ पासून ते २०२२ पर्यंत या संघाचं प्रतिनिधित्व केलं. यादरम्यान त्याने १०० पेक्षा अधिक गडी बाद केले. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून तो राजस्थान रॉयल्स संघाचं प्रतिनिधित्व करतोय. या संघाचं प्रतिनिधित्व करताना त्याने शानदार कामगिरी केली आहे.

फक्त IPL च नाही, तर टीम इंडियाकडूनही घेतल्यात सर्वात जास्त T20 विकेट्, पण खेळला नाही एकही WC मॅच
IPl 2024 RR vs MI: मुंबईविरुद्ध राजस्थानच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com