जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. मुंबईला हा सामना जिंकून, गेल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याची संधी होती. मात्र हा सामनाही मुंबई इंडियन्सला गमवावा लागला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने १७९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाने ९ गडी राखून हे आव्हान पूर्ण केलं. दरम्यान या सामन्यानंतर कशी आहे गुणतालिकेची स्थिती? जाणून घ्या.
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने या हंगामात दमदार कामगिरी करून दाखवली आहे. या संघाने ८ पैकी ७ सामने जिंकले आहे. १४ गुणांसह हा संघ अव्वल स्थानी आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आतापर्यंत ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत. तर सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. या संघाने देखील ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. या संघाने ७ पैकी ४ सामने जिंकले आहेत. यासह गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाने देखील प्रत्येकी ४-४ सामने जिंकले आहेत. मात्र रन रेटच्या बळावर चेन्नईचा संघ पुढे आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. या संघाला आतापर्यंत केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ ८ पैकी ३ सामने जिंकून आठव्या स्थानी आहे.
शिखर धवनच्या अनुपस्थितीत खेळत असलेला पंजाब किंग्जचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. या संघाने ८ पैकी २ सामने जिंकले आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ८ पैकी केवळ १ सामना जिंकला असून हा संघ सर्वात शेवटी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.