हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा मुंबईचा ८ सामन्यांपैकी पाचवा पराभव आहे. ६ गुणांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्स संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग खडतर होत चालला आहे. मात्र अजूनही मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकतो. दरम्यान कसं असेल समीकरण? समजून घ्या.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. यादरम्यान मुंबईला केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. तर ५ सामने गमवावे लागले आहेत. मुंबई इंडियन्स संघाला जर १६ गुणांपर्यंत पोहचायचं असेल तर पुढील ६ पैकी ५ सामने जिंकावे लागतील. मात्र १६ गुण मिळवल्यानंतरही मुंबई इंडियन्सला इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. इथून पुढे होणारा प्रत्येक सामना हा मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.
हे हंगाम सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादने मुंबईवर ३१ धावांनी विजय मिळवला. घरच्या मैदानावर खेळताना राजस्थान रॉयल्स संघाने मुंबई इंडियन्सचा पराभव केला.
मुंबई इंडियन्सला सुरवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर मुंबईने दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघावर विजय मिळवला. त्यानंतर चेन्नई विरुद्धचा सामना मुंबई इंडियन्सला गमवावा लागला. पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईने ९ धावांनी विजय मिळवला. तर राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला ९ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.