RR vs MI, IPL 2024: जयस्वालच्या 'यशस्वी' खेळीनंतर हिटमॅनकडून जादू की झप्पी! स्पेशल Video व्हायरल

Rohit Sharma-Yashasvi Jaiswal: मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून यशस्वी जयस्वालने शतकी खेळी केली. या खेळीनंतर हिटमॅनने त्याला जादू की झप्पी दिली. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
rohit sharma hugging yashasvi jaiswal after scoring century in rr vs mi match video viral amd2000
rohit sharma hugging yashasvi jaiswal after scoring century in rr vs mi match video viral amd2000twitter

मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात यशस्वी जयस्वालने तुफान फटकेबाजी केली. धावांचा पाठलाग करताना त्याने ६० चेंडूंचा सामना करत १०४ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार आणि ७ षटकार खेचले. मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्स संघासमोर जिंकण्यासाठी १८० धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाने ९ गडी राखून विजय मिळवला. हा राजस्थान रॉयल्स संघाचा या हंगामातील सातवा विजय ठरला आहे. दरम्यान या सामन्यातील रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. यशस्वी जयस्वालने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करत धावांचा पाऊस पाडला. दरम्यान त्याने आपलं शतक झळकावल्यानंतर मैदानात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. तर विरोधी संघातील खेळाडू रोहित शर्माने देखील त्याला मिठी मारली. वरिष्ठ खेळाडू म्हणून रोहितने मिठी मारत त्याचं कौतुकही केलं. हिटमॅनचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीचा ठरतोय. या व्हिडिओवर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देखील देताना दिसून येत आहेत.

rohit sharma hugging yashasvi jaiswal after scoring century in rr vs mi match video viral amd2000
IPL 2024 Points Table: राजस्थानचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा! मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं; पाहा पॉईंट्स टेबल

राजस्थानचा शानदार विजय..

मुंबई इंडियन्स संघावर एकतर्फी विजय मिळवत राजस्थान रॉयल्सने आपली गुणतालिकेतील स्थिती आणखी मजबूत केली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सने ८ पैकी ७ सामने जिंकले आहेत.

यादरम्यान १४ गुणांसह हा संघ अव्वल स्थानी कायम आहे. राजस्थान रॉयल्सचा प्लेऑफमध्ये पोहचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई इंडियन्सने ८ सामने खेळले आहेत. यादरम्यान मुंबईला केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. ६ गुणांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे

rohit sharma hugging yashasvi jaiswal after scoring century in rr vs mi match video viral amd2000
IPl 2024 RR vs MI: मुंबईविरुद्ध राजस्थानच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com