Rohit Sharma Funny Video: हे देवा! भर मैदानात शेन बॉन्डकडून रोहितचा चुंबन घेण्याचा प्रयत्न;मजेशीर Video व्हायरल

Rohit Sharma Shane Bond Viral Video: दोन्ही संघातील खेळाडूंचा सराव सुरु असताना रोहित शर्मा आणि राजस्थान रॉयल्स संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्डचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे देवा! भर मैदानात शेन बॉन्डकडून रोहितचा चुंबन घेण्याचा प्रयत्न;मजेशीर Video व्हायरल
rajasthan royals coach shane bond tried to kiss rohit sharma funny video viral amd2000twitter

जयपुरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल. या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू मैदानावर कसून सराव करताना दिसून येत आहेत. दरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंचा सराव सुरु असताना रोहित शर्मा आणि राजस्थान रॉयल्स संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्डचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचे हेड कोच शेन बॉन्ड यांनी सरावादरम्यान रोहित शर्माला किस करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर त्यांनी ' काही नाती ही अनमोल असतात..'असं लिहीलं आहे. रोहित शर्मा आर अश्विनसोबत चर्चा करत असताना शेन बॉन्ड मागुन येतात आणि त्याला किस करण्याचा प्रयत्न करतात. हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हे देवा! भर मैदानात शेन बॉन्डकडून रोहितचा चुंबन घेण्याचा प्रयत्न;मजेशीर Video व्हायरल
KKR vs RCB, IPL 2024: पराभवासोबतच फाफ डू प्लेसिसला आणखी एक मोठा धक्का! BCCI ने घेतली मोठी ॲक्शन

तर झाले असे की, रोहित शर्मा आणि आर अश्विन चर्चा करत असताना शेन बॉन्ड मागुन येतात आणि रोहितला किस करण्याचा प्रयत्न करतात. मात्र रोहित पुढे होतो. हे पाहून रोहित आणि आर अश्विनला देखील हसू आवरत नाही. शेन बॉन्ड आणि रोहित शर्माचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीाडियावर तुफान व्हायरल होतोय.

शेन बॉन्ड सध्या राजस्थान रॉयल्स संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. यापूर्वी २०१५ पासून ते २०२३ पर्यंत मुबंई इंडियन्स संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सने २०१५,२०१७,२०१९ आणि २०२० मध्ये जेतेपदाला गवसणी घातली होती.

हे देवा! भर मैदानात शेन बॉन्डकडून रोहितचा चुंबन घेण्याचा प्रयत्न;मजेशीर Video व्हायरल
KKR vs RCB Last Over: 20 व्या षटकातील थरार! IPL च्या सर्वात महागड्या खेळाडूला फिरकी गोलंदाजाने ठोकले ३ षटकार -Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com