Rohit Sharma Record: रोहित शर्मा रचणार इतिहास! एमएस धोनीनंतर असा रेकॉर्ड करणारा ठरणार दुसराच खेळाडू

Rohit Sharma 250th IPL Match: मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्स संघाने ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे.
rohit sharma will play his 250th ipl match today against punjab kings ms dhoni record amd2000
rohit sharma will play his 250th ipl match today against punjab kings ms dhoni record amd2000twitter

मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्स संघाने ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे. यादरम्यान रोहित शर्माने अनेक मोठ मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. दरम्यान या सामन्यातही त्याला एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३४ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा कर्णधार रोहित शर्माच्या आयपीएल कारकिर्दीतील २५० वा सामना असणार आहे. यापूर्वी केवळ एमएस धोनीला असा रेकॉर्ड करता आला आहे. धोनीने आतापर्यंत २५६ सामने खेळले आहेत. एमएस धोनीनंतर आयपीएल स्पर्धेत २५० सामने खेळणारा रोहित हा दुसराच खेळाडू ठरणार आहे.

rohit sharma will play his 250th ipl match today against punjab kings ms dhoni record amd2000
GT vs DC ,IPL 2024: शाहरुख खानच्या स्टम्पिंगवरुन पेटला वाद! अंपायर की रिषभ; नेमकी चूक कोणाची?

गेली १० वर्ष मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माने आतापर्यंत २४९ सामने खेळले आहेत. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात तो आपला २५० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. रोहित,धोनी पाठोपाठ विराटने आतापर्यंत २४४ सामने खेळले आहेत. तो देखील याच हंगामात आपला २५० वा सामना खेळताना दिसून येईल. असा रेकॉर्ड करणारा तो तिसराच खेळाडू ठरेल.

rohit sharma will play his 250th ipl match today against punjab kings ms dhoni record amd2000
IPl 2024 : दिल्लीच्या विजयानंतर Points table मध्ये उलटफेर; राजस्थान, कोलकाताचं झालं काय?

असा राहिलाय रेकॉर्ड..

रोहित शर्माने केवळ फलंदाजीत नव्हे तर गोलंदाजीतही शानदार कामगिरी केली आहे. त्याने डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळताना हॅट्ट्रिक देखील घेतली आहे. मुंबई इंडियन्स संघाकडून खेळण्यापूर्वी त्याने डेक्कन चार्जर्स संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com