IPl 2024 Point Table : आयपीएल २०२४ चा ३२ व्या सामन्यात गुजरातचा दारुण पराभव झाला. दिल्लीने गुजरातला नमवत पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलटफेर घडवलीय. मंगळवारी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात राजस्थानचा विजय झाला. या विजयाने गुणतालिकेत झालेल्या बदलानंतर आता परत एकदा यात बदल घडलाय.
या बदलाचा राजस्थान आणि कोलकाताच्या स्थानावर काय परिणाम झालाय का पाहू. मंगळवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत कोलकाताने राजस्थानसमोर २२४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत रंगली. अखेर शेवटच्या चेंडूवर सामन्याचा निकाल लागला आणि राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. दरम्यान या सामन्यानंतर कशी आहे गुणतालिकेची स्थिती? जाणून घ्या.
राजस्थानला हा सामना जिंकण्यासाठी २२४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानने संथ सुरुवात केली होती. राजस्थानला सलामवीर यशस्वीच्या रुपात पहिला झटका बसला. यशस्वी १९ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर संजू सॅमसन आणि जोस बटलर या दोन्ही खेळाडूंनी २५ धावांची भागीदारी केली.
डावाच्या १९ व्या षटकात जोस बटलरने राजस्थानच्या बाजूने फासे फिरवले. या सामन्यात बटलरने ६० चेंडूंमध्ये १०७ धावांची नाबाद खेळी केली. या शतकी खेळीसह त्याने ख्रिस गेलला मागे टाकत आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा दुसरा फलंदाज होण्याचा मान पटकावला. बटलरने आयपीएलमध्ये सात शतके ठोकली आहेत तर गेलने सहा शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर विराट कोहली आठ शतकांसह अव्वल स्थानावर कायम आहे.
राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतर १२ गुण आणि +०.६७७ च्या रन रेटसह राजस्थानचा संघ प्रथम स्थानावर आहे. तर, कोलकाता नाईट राइडर्सचा संघ ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलच्या ३१व्या सामन्यापूर्वीच दोन्ही संघ अनुक्रमे एक आणि दोन क्रमांकावर होते. राजस्थानने आतापर्यंत ७ सामन्यांमध्ये ६ सामने जिंकले आहेत.
दुसरीकडे, कोलकाताने आतापर्यंत ६ सामन्यांमध्ये ४ सामने जिंकले आहेत. दरम्यान बुधवारी झालेल्या गुजरात आणि दिल्लीच्या सामन्याने या गुणतालिकेत मोठा बदल घडवून आलाय. दिल्लीने पॉइट्स टेबलमध्ये झेप घेत मुंबई इंडियन्सला मागे टाकले आहे. तर दिल्लीचा संघा या तालिकेत सहाव्या स्थानी विराजमान झालाय.
दरम्यान आयपीएल २०२४च्या फायनल्सला अजून बराचं काळ बाकी आहे. या काळात भरपूर सामने रंगतील आणि पॉईंट्स टेबलमध्ये बरेचं बदल दिसून येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.