IPl 2024 RR vs MI: मुंबईविरुद्ध राजस्थानच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय

IPl 2024 RR vs MI: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना होत आहे.
IPl 2024 RR vs MI: मुंबईविरुद्ध राजस्थानच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय
Rajasthan Royals vs Mumbai Indians x ipl
Published On

Rajasthan Royals vs Mumbai Indians

मुंबईचा कर्णधार हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने २० षटकांत ९ गडी गमावून १७९ धावा केल्या. राजस्थानला विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने दमदार सुरुवात केलीय. आरआरच्या संघाने ६१ धावांपर्यंत मजल मारली असून विजयाकडे वाटचाल करणाऱ्या राजस्थानच्या फलंदाजीत पावसाने व्यत्यय आणलाय.

दरम्यान राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. त्याच्या २ षटकात २ विकेट पडल्या. पहिल्याच षटकात रोहित शर्मा बाद झाला त्यानंतर दुसऱ्याच षटकात इशान किशन पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहितला ट्रेंट बोल्टने संजू सॅमसनच्या हाती झेलबाद केले. तर इशान किशन खाते न उघडताच माघारी परतला. किशनला संदीप शर्माने झेल बाद केलं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या सुर्यकुमार यालाही मोठी खेळी करता आली नाही. पण तिलक वर्मा आणि नहेल वढेरा यांच्या खेळीमुळे मुंबईने १७९ धावांचा पल्ला गाठला. तिलक वर्माने ४५ चेंडूत ६५ धावा केल्या. नेहल वढेराने २४ चेंडूत ४९ धावांची खेळी केली. राजस्थानकडून संदीप शर्माने ५ बळी घेतले. ट्रेंट बोल्टने २ बळी घेतले. आवेश खान आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी १ विकेट घेतली.

मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या सलामीवीर जोडीने दमदार सुरुवात केली. जॉस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी आक्रमक खेळाला सुरुवात करत ६ षटकात ६१ धावा धाव फलकावर लावल्या. मुंबईचा संघ विकेट मिळवण्याच्या प्रयत्नात होता परंतु बटलर आणि यशस्वीने शानदार खेळाचं प्रदर्शन करत आपली विकेट टिकवून ठेवली. दरम्यान ६ षटकाचा खेळ झाला असताना वरुण राजाने बॅटिंग केली. पावसामुळे काही काळापुरता खेळ थांबवावा लागला.

दोन्ही सांगांची खेळी ११

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (डब्ल्यूके/कर्णधार), रायन पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

मुंबई इंडियन्स : इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.

IPl 2024 RR vs MI: मुंबईविरुद्ध राजस्थानच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय
IPl 2024 RR vs MI: वढेरा-तिलकने सावरला MIचा डाव;राजस्थानसमोर १८० धावांचे आव्हान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com