Yashasvi Jaiswal Sixes: नॉर्मल वाटलोय का? 6,6,6; बशीरच्या गोलंदाजीवर यशस्वी जयस्वालचे बॅक टू बॅक 3 षटकार- Video

Yashasvi Jaiswal Sixes On Shoaib Bahsir Bowling: भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल पुन्हा एकदा इंग्लिश गोलंदाजांवर गरजला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धरमशालेत सुरू आहे.
Yashasvi Jaiswal smashed 3 sixes in shoaib bashir over during india vs england 5th test watch video
Yashasvi Jaiswal smashed 3 sixes in shoaib bashir over during india vs england 5th test watch video twitter
Published On

India vs England 5th Test, Yashasvi Jaiswal Sixes:

भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल पुन्हा एकदा इंग्लिश गोलंदाजांवर गरजला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धरमशालेत सुरू आहे. या सामन्यात सलामीला आलेल्या जयस्वालने ५८ चेंडूत ५७ धावा ठोकल्या. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याने या मालिकेत आतापर्यंत ७१२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २६ षटकार मारले आहेत.

यशस्वी जयस्वाल आपल्या निर्भिड फलंदाजीसाठी ओळखला जातो. या सामन्यातही त्याने निर्भिड फलंदाजी करत इंग्लडचा फिरकीपटू शोएब बशीरवर चांगलाच हल्लाबोल केला. त्याने बशीरच्या एकाच षटकात खणखणीत ३ षटकार मारले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Yashasvi Jaiswal smashed 3 sixes in shoaib bashir over during india vs england 5th test watch video
IND vs ENG 5th Test Highlights: बॅझबॉलला उत्तर बॅझबॉलनेच! रोहित अन् जयस्वालकडून इंग्लिश गोलंदाजांची धुलाई

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना इंग्लंडकडून १० वे षटक टाकण्यासाठी शोएब बशीर गोलंदाजीला आला. या षटकातील तिसऱ्या, पाचव्या आणि शेवटच्या चेंडूवर जयस्वालने खणखणीत षटकार मारले. बशीरच्या या षटकात त्याने १८ धावा वसूल केल्या. जयस्वालचा कसोटीत टी -२० स्टाईल फलंदाजी केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. (Cricket news in marathi)

जयस्वालची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी..

यशस्वी जयस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. हा शिखर त्याने केवळ ९ व्या कसोटीत गाठला आहे. याबाबतीत त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला मागे सोडलं आहे. विनोद कांबळीने हा कारनामा १२ व्या कसोटीत केला होता. तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या २१८ धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने ५, आर अश्विनने ४ आणि रविंद्र जडेजाने १ गडी बाद केला.

Yashasvi Jaiswal smashed 3 sixes in shoaib bashir over during india vs england 5th test watch video
IND vs ENG 5th Test, Toss Update: प्रतिष्ठा राखण्यासाठी इंग्लंडचा संघ मैदानात! टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग ११

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com