kho- kho twitter
Sports

Kho-Kho World Cup: भारतात होणार पहिला खो-खो वर्ल्डकप! जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Kho Kho World Cup Details: भारतात पहिल्या वहिल्या खो- खो वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.

Ankush Dhavre

खो-खो खेळाला सोनेरी दिवस येणार आहेत. भारतीय खो-खो महासंघ आणि आंतरराष्ट्रीय खो-खो महासंघाने २०२५ खो-खो वर्ल्डकप स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेचे आयोजन भारतात केले जाणार आहे. या स्पर्धेत ६ महाद्वीपातील २४ देशांचा सहभाग असणार आहे. ज्यात १६ महिला आणि १६ पुरुष संघांचा समावेश असणार आहे.

शाळेत असताना प्रत्येकाने एकदातरी खो-खो हा खेळ खेळला असेल. मातीवरचा हा खेळ आता मॅटवर खेळला जातो. भारतात या खेळाची क्रेझ नेक्स्ट लेव्हलला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. आता भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवता येणार आहे. जगभरात ५४ देश हा खेळ खेळत आहेत.

भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशु मित्तल यांनी आयोजनाबाबत बोलताना म्हटले की, ' आम्ही पहिल्या खो-खो वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी उत्सुक आहोत. ही केवळ एक स्पर्धा नसणार आहे, तर देशांना एकत्र आणण्याचं आणि संपूर्ण जगाला खो-खो या खेळाचं सौंदर्य दाखवण्याचं काम करणार आहे. खो- खो खेळाला ऑलिम्पिक मान्यता मिळवून देणे हे आमचे अंतिम ध्येय असणार आहे. हे वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

SCROLL FOR NEXT