IND vs BAN: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! कानपूर कसोटी जिंकताच मोडले हे मोठे रेकॉर्ड

Team India Records After India vs Bangladesh Test Series: कानपूर कसोटी सामना जिंकताच भारतीय संघाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
IND vs BAN: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! कानपूर कसोटी जिंकताच मोडले हे मोठे रेकॉर्ड
team indiatwitter
Published On

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर रोहितसेनेने इतिहास रचला आहे. या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकत बांगलादेशला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. पहिल्या दिवशी ३५ षटकांचा खेळ झाला, त्यानंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ३ दिवस खेळाडू मैदानात उतरुच शकले नाहीत.

अखेर चौथ्या दिवशी पावसाने ब्रेक घेतला आणि भारतीय संघाने गिअर टाकत सुसाट वेग पकडला. आधी गोलंदाजीत बांगलादेशचा डाव हाणून पाडला. त्यानंतर फलंदाजीत बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. भारताला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या ९५ धावा करायच्या होत्या. हे आव्हान पूर्ण करत भारतीय संघाने हा सामना अडीच दिवसात आपल्या नावावर केला. यादरम्यान अनेक मोठे रेकॉर्ड्स बनवले गेले आहेत.

या सामन्यातील अडीच दिवस पावसामुळे वाया गेला, पण तरीही भारतीय संघाने पूर्ण जोर लावला आणि विजय खेचून आणला. दरम्यान दोन दिवस पावसामुळे वाया जाऊनही सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर यापू्र्वीही ७ वेळेस असा रेकॉर्ड झाला आहे.

IND vs BAN: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! कानपूर कसोटी जिंकताच मोडले हे मोठे रेकॉर्ड
IND vs BAN 2nd Test : रोहित-गंभीरच्या डावपेचामुळे बांगलादेशचा खेळ खल्लास, टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
  1. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, ड्युनेडीन, १९५५

  2. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, हेडिंग्ली, १९५८

  3. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०००

  4. न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश, हॅमिल्टन, २००१

  5. न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश, वेलिंग्टन, २०१९

  6. न्यूझीलंड विरुद्ध भारत, साऊहॅम्प्टन, २०२१

  7. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दी ओव्हल, २०२२

  8. भारत विरुद्ध बांगलादेश, कानपूर, २०२४

IND vs BAN: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! कानपूर कसोटी जिंकताच मोडले हे मोठे रेकॉर्ड
IND vs BAN 2nd Test: कसोटीत टी-२० स्टाईल बॅटिंग! टीम इंडियाने मोडले हे मोठे रेकॉर्ड्स

भारताच टीम इंडियाच किंग..

असं म्हणतात की, भारतात खेळताना भारतीय संघाला हरवणं हे वर्ल्डकप जिंकण्यासारखंच आहे. असं का म्हणतात? तर ही आकडेवारी पाहून तुम्हाला अंदाज येईलच. भारतीय संघाने २०१३ मध्ये मायदेशात खेळताना इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी मालिका गमावली होती.

तेव्हापासून ते आतापर्यंत भारतीय संघाने एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. २०१३ पासून २०२४ पर्यंत भारतीय संघाने मायदेशात एकूण १७ कसोटी मालिका खेळल्या आहेत. या सर्व मालिकांमध्ये भारताीय संघाने विजय मिळवला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने १९९४ ते २००० या दरम्यान सलग १० कसोटी मालिका जिंकण्याचा कारनामा केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com