भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने शानदार कामगिरी करून दाखवली आहे. या सामन्यातील ३ दिवसांचा खेळ पावसामुळे धुतला गेला. सामन्यातील पहिल्या दिवशी अवघ्या ३५ षटकांचा खेळ झाला.
त्यामुळे असं वाटलं होतं की, हा सामना ड्रॉ होणार. मात्र आधी विकेट्स घेऊन आणि नंतर धावांचा पाऊस पाडून भारतीय संघाने विजयाची आशा कायम ठेवली आहे. पहिल्या डावात रोहित, जयस्वाल, विराट आणि केएल राहुलने टी -२० स्टाईल फलंदाजी केली. यासह कसोटीत मोठा रेकॉर्डची नोंद केली आहे.
या सामन्यात बांगलादेशचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला २३३ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ताबडतोड फलंदाजी केली आणि अवघ्या ३४.४ षटकात २८५ धावांचा पल्ला गाठत डाव घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेश संघाला २ गडी बाद २६ धावा करता आल्याम. पहिल्या डावात भारतीय संघ आघाडीवर आहे.
भारतीय संघाने चौथ्या दिवशी रेकॉर्डचा पाऊस पाडला आहे. गेल्या १४७ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडलं नव्हतं, ते चौथ्या दिवशी घडलं. भारतीय संघाने सर्वात जलद ५०,१०० आणि २०० धावांचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. भारतीय संघाने अवघ्या ६१ चेंडूत १०० धावांचा आकडा गाठला. त्यानंतर २४.२ षटकात २०० धावांचा पल्ला गाठला.
भारतीय संघाकडून फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने अवघ्या ५१ चेंडूंचा सामना करत ७२ धावांची तुफानी खेळी केली. तर रोहितने टी -२० स्टाईल फलंदाजी करत ११ चेंडूत २३ धावा केल्या. त्यानंतर शुभमन गिलने ३९, विराटने ४७ आणि केएल राहुलने ६८ धावांची खेळी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.