IND vs BAN: दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला, तर टीम इंडियासाठी कसं असेल WTC फायनलचं समीकरण?

World Test Championship Final: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील दुसरा सामना ड्रॉ झाला, तर कसं असेल समीकरण? जाणून घ्या.
IND vs BAN: दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला, तर टीम इंडियासाठी कसं असेल WTC फायनलचं समीकरण?
team indiatwitter
Published On

WTC Final Scenario For Team India: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघामध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशला २८० धावांनी धूळ चारली. मालिकेतील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात पावसाने तुफान बॅटिंग केली.

त्यामुळे पहिल्या दिवशी ३५ षटकांचा खेळ झाल्यानंतर पुढील २ दिवस एकही चेंडू टाकला गेलेला नाही. जर हा सामना ड्रॉ झाला, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघाचं किती नुकसान होईल? जाणून घ्या.

जर सामना ड्रॉ झाला तर...

भारतीय संघ हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सर्वात मजबूत स्थितीत आहे. भारतीय संघ ७१.६७ टक्के सरासरीसह अव्वल स्थानी कायम आहे. इथून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सहज प्रवेश करू शकतो. मात्र सामना ड्रॉ झाला, तर भारतीय संघाचं टेन्शन वाढणार आहे.

IND vs BAN: दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला, तर टीम इंडियासाठी कसं असेल WTC फायनलचं समीकरण?
IND vs BAN 2nd Test: भारत - बांगलादेश कसोटीत चौथ्या दिवशी सॉलिड ट्विस्ट; उद्या थेट रीझल्ट लागणार

जर भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला, तर भारतीय संघाची सरासरी घसरून ६८.१८ वर येऊन पोहचेल. अशा स्थितीत भारतीय संघाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करावं लागेल. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडला पराभूत करणं जरा सोपं आहे. मात्र बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.

IND vs BAN: दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला, तर टीम इंडियासाठी कसं असेल WTC फायनलचं समीकरण?
IND vs BAN 2nd Test, Day 4: चौथ्या दिवशीही पावसाची बॅटिंग? कानपूरमधून समोर आली मोठी अपडेट

गेल्या २ दौऱ्यावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. मात्र यावेळी आव्हान कठीण असणार आहे. भारतीय संघ येत्या काही महिन्यात काही महिन्यात ८ कसोटी सामने खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारतीय संघाला ८ पैकी ५ सामने जिंकावे लागणार आहेत. यासह ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेने पुढील काही सामने गमावले. तर भारतीय संघाचा फायनलमध्ये जाण्याचा मार्ग आणखी सोपा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com