कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यातील सुरुवातीचे ३ दिवस पावसामुळे धुतले गेले. तर चौथ्या दिवशी आक्रमक खेळ पाहायला मिळाला. ड्रॉ च्या दिशेने जात असलेल्या सामन्यात आता भारतीय संघ विजयाचा दावेदार मानला जातोय. दरम्यान सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय संघातील ३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. काय आहे कारण? जाणून घ्या.
भारतीय संघातून बाहेर पडणारे खेळाडू आहेत, ध्रुव जूरेल, सरफराज खान आणि वेगवान गोलंदाज यश दयाल. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, की या तिघांना अचानक बाहेर का केलं? हे तिघेही इराणी कप स्पर्धेचा भाग आहेत.
आजपासून लखनऊच्या इकाना स्टेडियमवर मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया या दोन्ही संघांमध्ये इराणी कपचा सामना रंगणार आहे. या स्पर्धेचा भाग असल्यामुळे बीसीसीआयने या खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने सोमवारी (३० सप्टेंबर) एक पोस्ट शेअर करत याबाबत अपडेट दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, लखनऊमध्ये होणाऱ्या इराणी कपसाठी ध्रुव जुरेल, सरफराज खान, यश दयाल यांना रिलीज करण्यात येत आहे.
आगामी इराणी कप स्पर्धेत ध्रुव जुरेल आणि यश दयाल हे दोघेही रेस्ट ऑफ इंडियाकडून खेळताना दिसणार आहेत. तर सरफराज खान मुंबईकडून खेळणार आहे.
इराणी कपसाठी असे आहेत दोन्ही संघ :
रेस्ट ऑफ इंडिया:
ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, अभिमन्यु ईश्वरन, साई सुदर्शन, ईशान किशन (यष्टिरक्षक), रिकी भुई, सारांश जैन, राहुल चाहर, शाश्वत रावत, यश दयाल, ध्रुव जुरेल,मानव सुथार, मुकेश कुमार, खलील अहमद, प्रसिद्ध कृष्णा.
असा आहे मुंबईचा संघ:
पृथ्वी शॉ, सिद्धेश लाड, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक तमोरे (यष्टिरक्षक), शम्स मुलानी, सरफराज खान, सिद्धांत अधातराव, हिमांशु सिंग, एम जुनेद खान, आयुष म्हात्रे, शार्दुल ठाकुर, तनुश कोटियन, मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस, सूर्यांश शेडगे
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.