Sarfaraz Khan: 4,4,4,4,4... मुशीरनंतर सरफराजचाही धमाका! भारतीय गोलंदाजाला धू धू धुतलं- VIDEO

Duleep Trophy 2024, Sarfaraz Khan 5 Boundries In Over: दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सरफराज खानच्या फलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला आहे.
Sarfaraz Khan: 4,4,4,4,4... मुशीरनंतर सरफराजचाही धमाका! भारतीय गोलंदाजाला धू धू धुतलं- VIDEO
sarfaraz khantwitter
Published On

भारतात दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. इंडिया ए चा सामना इंडिया बी विरुद्ध तर इंडिया सी चा सामना इंडिया डी विरुद्ध सुरू आहे. इंडिया ए आणि इंडिया बी यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात सरफराज खानच्या शानदार फटकेबाजीचा नजारा पाहायला मिळाला आहे.

इंग्लंडविरुद्ध अपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सरफराज खानने दुलीप ट्रॉफी स्पर्धेत भारतीय गोलंदाजाविरुद्ध फलंदाजी करताना एकाच षटकात लागोपाठ ५ चौकार खेचले आहेत. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सरफराज खान अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंडिया बी संघाचं प्रतिनिधित्व करतोय. या संघाकडून खेळताना त्याने इंडिया ए संघाचा गोलंदाज आकाशदीपच्या षटकात चौकारांचा पाऊस पाडला आहे.

Sarfaraz Khan: 4,4,4,4,4... मुशीरनंतर सरफराजचाही धमाका! भारतीय गोलंदाजाला धू धू धुतलं- VIDEO
Team India Selector: BCCI ची मोठी घोषणा! टीम इंडियाच्या माजी विकेटकीपरला बनवलं सिलेक्टर

एकाच षटकात खेचले ५ चौकार

या षटकातील पहिला चेंडू निर्धाव राहिला. मात्र पुढील चेंडूवर सरफराज खान नावाचं वादळ आलं. त्याने पुढच्याच चेंडूवर त्याने थर्ड मॅनच्या दिशेने चौकार मारलं त्यानंतर पुढील चेंडूवर त्याने कव्हरच्या दिशेने शानदार चौकार मारला.

चौथ्या चेंडूवर त्याने लेग साईडच्या दिशेने शानदार चौकार खेचला. त्यानंतर पाचवा चौकार त्याने ऑफ साईडच्या दिशेने मारला. या पाचही चौकरांचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

Sarfaraz Khan: 4,4,4,4,4... मुशीरनंतर सरफराजचाही धमाका! भारतीय गोलंदाजाला धू धू धुतलं- VIDEO
Duleep Trophy: सामन्यादरम्यान अचानक मैदानात घुसला चाहता, थेट ऋतुराज गायकवाड जवळ पोहचला आणि केलं असं की...!

एकाच मालिकेत केलं पदार्पण

सरफराज खान आणि आकाश दीप यांना इंग्लंडविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. सरफराजला इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर चौथ्या कसोटीत आकाश दीपने पदार्पण केलं होतं.

सरफराज खानने आपल्या पदार्पणातच शानदार अर्धशतक साजरं केलं होतं. तर आकाश दीपने ३ गडी बाद केले होते. सरफराज खानला भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com