Team India Selector: BCCI ची मोठी घोषणा! टीम इंडियाच्या माजी विकेटकीपरला बनवलं सिलेक्टर
Ajay Ratra News In Marathi: बीसीसीआयने मंगळवारी (३ सप्टेंबर) मोठी घोषणा केली आहे. अजय रात्रा यांची पुरुष क्रिकेट संघाचे निवडकर्ता म्हणून निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीच्या ५ सदस्यांमध्ये आता अजय रात्रा यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. येत्या ५ सप्टेंबर पासून दुलीप ट्रॉफी स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. दरम्यान या स्पर्धेपासूनच अजय रात्रा यांचा कार्यकाळ सुरू होणार आहे.
काय असेल रोल?
बीसीसीआयच्या निवड समितीत नव्याने समावेश करण्यात आलेला अजय रात्रा यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते निवड समितीतील ४ सदस्यांसह मिळून अतिशय महत्वाची भूमिका बजावणार आहेत. हे सदस्य भारताचं नवीन टॅलेंट शोधणार आहेत. जे भविष्यातील खेळाडू शोधून काढतील आणि त्यांना तयार करण्याचं काम करतील.
कोचिंगचाही अनुभव
अजय रात्रा यांना कोंचिगचाही बराच अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत पंजाब, उत्तर प्रदेश आणि आसाम सारख्या संघांना कोचिंग दिली आहे. यापूर्वी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेदरम्यान ते भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्येही दिसून आले होते.
अजय रात्रा यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी आणि ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. ५ सप्टेंबरपासून दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
या स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते. ही भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सुवर्णसंधी आहे. बांगलादेशविरुद्धची मालिका झाल्यानंतर, भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका आणि ऑस्ट्रेलियात जाऊन बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळायची आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.