Duleep Trophy: सामन्यादरम्यान अचानक मैदानात घुसला चाहता, थेट ऋतुराज गायकवाड जवळ पोहचला आणि केलं असं की...!

Duleep Trophy: सध्या दुलिप ट्रॉफी खेळवण्यात येत असून इंडिया सी आणि इंडिया डी यांच्यामध्ये सामना खेळवण्यात येतोय. दरम्यान सामन्यातील एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
fan broke security and touched Rituraj Gaikwad
fan broke security and touched Rituraj Gaikwadsaam tv
Published On

सध्या देशांतर्गत दुलिप ट्रॉफी खेळवण्यात येतेय. यावेळी इंडिया सी आणि इंडिया डी यांच्यामध्ये अनंतपुरच्या रुरल डेवलपमेंट ट्रस्ट स्टेडियममध्ये सामना खेळवण्यात येतोय. दरम्यान या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होताना दिसताय. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सामन्यादरम्यान काय घडलं?

दुलीप ट्रॉफी सामन्यादरम्यान सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा सुरु झाली. झालं असं की, या सामन्यात एका प्रेक्षकाने मैदानाची सुरक्षा तोडून मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी हा चाहता घुसून ऋतुराज गायकवाडच्या पाया पडला. ऋतुराज गायकवाड भारत सी टीमचा कर्णधार असून चाहत्याच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सध्याच्या दुलीप ट्रॉफीमध्ये अनेक टीम इंडियातील अनेक खेळाडूंनी भाग घेतला आहे. टीम इंडियाचे सध्या कोणतेही सामने नाहीत. येत्या १९ सप्टेंबरपासून बांग्लादेश विरूद्ध भारत यांच्यातील टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. या टेस्ट सिरीजचं महत्त्व पाहता टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी ही दुलिप ट्रॉफी फार महत्त्वाची आहे.

इंडिया डी ची उत्तम कामगिरी

कर्णधार श्रेयस अय्यर आणि देवदत्त पडिक्कल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर इंडिया-डीने दुलीप ट्रॉफी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंडिया-सी विरुद्ध 202 रन्सची आघाडी वाढवली. यावेळी श्रेयस अय्यरने चांगली कामगिरी केली. अय्यरला टीम इंडियामध्ये कमबॅक करायचं आहे, यासाठी अय्यरने 44 चेंडूंमध्ये नऊ फोर आणि एका सिक्ससह 54 रन्स केले.

याशिवाय दुसरीकडे देवदत्त पडिक्कलने 70 चेंडूंमध्ये आठ चौकारांसह 56 रन्स केले. इंडिया डीच्या टीमने दुसऱ्या डावात आठ विकेट्स गमावत 206 रन्स केलेत.

fan broke security and touched Rituraj Gaikwad
Cricketer Death News: धक्कादायक! क्रिकेट खेळताना खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com