indian cricket team twitter
Sports

IND vs SL: या 3 खेळाडूंना भारत- श्रीलंका मालिकेत संधी मिळणं कठीण! संपूर्ण मालिकेत बाकावर बसावं लागणार

Team India, India vs Sri Lanka: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघातील ३ खेळाडूंना संधी मिळणं कठीण आहे.

Ankush Dhavre

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २७ जुलै रोजी रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघातील सर्वात मोठा बदल म्हणजे रोहित शर्माऐवजी सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. दरम्यान या मालिकेसाठी युवा खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आलं आहे. काही खेळाडू असेही आहेत, ज्यांना संघात तर स्थान मिळालं आहे. मात्र प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं खूप कठीण आहे. कोण आहेत ते खेळाडू? जाणून घ्या.

वॉशिंग्टन सुंदर-

झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने शानदार कामगिरी केली होती. या मालिकेत त्याला मालिकावीर पुरस्कार देखील देण्यात आला होता. मात्र श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत त्याला संधी मिळणं कठीण आहे. कारण या मालिकेसाठी अक्षर पटेल आणि रवि बिश्नोई यांना भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. अक्षर पटेल गोलंदाजीसह फलंदाजीतही योगदान देतो. तर फिरकी गोलंदाजीच्या तुलनेत रवि बिश्नोई हा वॉशिंग्टन सुंदरला मागे सोडतो. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.

संजू सॅमसन -

भारतीय संघातील स्टार फलंदाज संजू सॅमसनला टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. यासह रिषभ पंतचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. रिषभ पंतला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल. त्यामुळे यष्टीरक्षक म्हणून तर स्थान मिळणं कठीण आहे. यासह फलंदाज म्हणून रिंकू सिंग, शिवम दुबे आणि हार्दिक पंड्यासारख्या आक्रमक फलंदाजांचा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यामुळे संजू सॅमसनला संपूर्ण मालिकेत बाकावर बसावं लागेल.

रियान पराग -

रियान परागला झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या मालिकेतून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मात्र या मालिकेत त्याला आपली छाप सोडता आली नाही. मात्र त्याच्यावर विश्वास दाखवून त्याचा श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र मध्यक्रमात एकापेक्षा एक धाकड फलंदाज असल्यामुळे त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं कठीण आहे.

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उप कर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT