Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडून 117 खेळाडू उतरणार मैदानात! महाराष्ट्रातील किती खेळाडूंचा समावेश?

Maharashtra Players In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला येत्या २६ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातील किती खेळाडूंचा समावेश आहे? जाणून घ्या.
paris olympics
paris olympicsyandex
Published On

मिशन गोल्ड'साठी भारतीय खेळाडूंनी कंबर कसली आहे. क्रीडाविश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस राहिले आहेत. यावेळी पदकांची संख्या वाढविण्यासाठी भारताने आपला सर्वोत्तम खेळाडूंचा चमू पाठवला आहे. या स्पर्धेला येत्या २६ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. दरम्यान या चमूमध्ये महाराष्ट्रासह, किती राज्यातील किती खेळाडूंनी सहभाग घेतला आहे? जाणून घ्या.

भारताने २०२० मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. याच स्पर्धेत भारताने विक्रमी ७ पदकांवर नाव कोरलं होतं. तर आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला, तर भारताने आतापर्यंत एकूण ३५ पदकांवर नाव कोरलं आहे. ९ रौप्य, १६ कांस्य आणि १० सुवर्णपदकांचा समावेश आहे.

paris olympics
Team India Captain: ना हार्दिक,ना सूर्या; शुभमन गिल होणार भविष्यातील कर्णधार! ही आहेत प्रमुख कारणं

महाराष्ट्रातील किती खेळाडूंचा समावेश?

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्टातील ५ खेळाडूंचा समावेश आहे. ज्यात उंच उडी इव्हेंटमध्ये सर्वेश कुमार, बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टी, स्वप्नील कुसळे ५० मीटर रायफल शूटिंग प्रकारात खेळताना दिसेल. तर महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळेला ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

paris olympics
IND vs SL, Team India: ऋतुराजला डच्चू तर हार्दिकची उप कर्णधारपदावरुन सुट्टी! BCCI ने घेतले हे 5 'गंभीर' निर्णय

इतर राज्यातील किती खेळाडूंचा समावेश?

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक खेळाडू हे हरियाणाचे आहेत. या राज्यातील २४ खेळाडू देशाचा मान वाढविण्यासाठी मैदानात उतरतील. तर पंजाबचे १९ खेळाडू देशाचं प्रतिनिधित्व करताना दिसतील.

यासह उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातील प्रत्येकी ७ खेळाडू प्रतिनिधित्व करणार आहेत. तर तामिळनाडूतील १३ आणि केरळ राज्यातील ६ खेळाडू देशाचं प्रतिनिधित्व करताना दिसतील. या स्पर्धेला २६ जुलैपासून सुरुवात होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com