Riyan Parag Statement: 'मी टी-२० वर्ल्डकप पाहणारच नाही..'रियान परागची तिखट प्रतिक्रिया

Riyan Parag On Team India: भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप खेळण्यात व्यस्त आहे. दरम्यान या स्पर्धेबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर रियान परागने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
Riyan Parag Statement: 'मी टी-२० वर्ल्डकप पाहणारच नाही..'रियान परागची तिखट प्रतिक्रिया
riyan parag on t-20 world cup 2024google

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. तर ९ जून रोजी भारत- पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. आतापर्यंत या स्पर्धेतील ३ सामने खेळले गेले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये रोमांचक लढती पाहायला मिळाल्या आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच अनेक दिग्गज खेळाडूंनी सेमीफायनलमध्ये जाणाऱ्या ४ संघांची नावं सांगितली आहेत. दरम्यान रियान परागला कोणते ४ संघ सेमीफायनलमध्ये जाणार? असा प्रश्न विचारल असता त्याने आश्चर्यचकीत करणारं उत्तर दिलं आहे.

ज्यावेळी रियान परागला विचारण्यात आलं की, कोणते ४ संघ सेमीफायनलमध्ये जाणार? या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला की, 'मी ही स्पर्धा पाहणार नाही. स्पर्धेत कोणते ४ संघ सेमीफायनलमध्ये जाणार या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. मी जर उत्तर दिलं, तर दुजाभाव केल्यासारखं होईल. खरं सांगू, तर मी वर्ल्डकप पाहणारच नाही. मला फक्त हेच पाहायचं आहे की, कोणता संघ चॅम्पियन बनतो. ज्यावेळी मी वर्ल्डकप खेळणार, त्यावेळी मी टॉप ४ चा विचार करेल. '

Riyan Parag Statement: 'मी टी-२० वर्ल्डकप पाहणारच नाही..'रियान परागची तिखट प्रतिक्रिया
IPL 2025 Mega Auction: मेगा ऑक्शनमध्ये किती खेळाडूंना रिटेन करता येणार? फ्रेंचाईजींचं टेन्शन वाढलं!

आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी

आयपीएल २०२४ स्पर्धेत रियान पराग जोरदार चर्चेत राहिला. राजस्थान रॉयल्स संघाचं प्रतिनिधित्व करताना त्याने धावांचा पाऊस पाडला. त्याने या स्पर्धेतील १६ सामन्यांमध्ये १४९.२१ च्या स्ट्राईक रेटने ५७३ धावा केल्या आहेत. तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी होता.

Riyan Parag Statement: 'मी टी-२० वर्ल्डकप पाहणारच नाही..'रियान परागची तिखट प्रतिक्रिया
WI vs PNG: पापुआ न्यू गिनीने वेस्टइंडिजला फोडला घाम! अटीतटीच्या लढतीत कसाबसा ५ विकेट्सने मिळवला विजय

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला होता. मात्र या सामन्यात राजस्थान रॉयल्सला सनरायझर्स हैदराबादकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला दावेदार मानलं जात होतं. मात्र त्याला संघात स्थान दिलं गेलं नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com