WI vs PNG: पापुआ न्यू गिनीने वेस्टइंडिजला फोडला घाम! अटीतटीच्या लढतीत कसाबसा ५ विकेट्सने मिळवला विजय

WI vs PNG, ICC T20 World Cup 2024: वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील दुसऱ्याच सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळू शकला असता.
WI vs PNG: पापुआ न्यू गिनीने वेस्टइंडिजला फोडला घाम! अटीतटीच्या लढतीत कसाबसा  ५ विकेट्सने मिळवला विजय
wi vs pngtwitter

आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत दोन वेळचा चॅम्पियन वेस्टइंडिज संघ आणि पापुआ न्यू गिनी या संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. नवख्या पापुआ न्यू गिनी संघाने अनुभवी वेस्टइंडिज संघाचा चांगलाच घाम फोडला. शेवटी वेस्टइंडिजने या सामन्यात ५ गडी राखून बाजी मारली. पापुआ न्यू गिनी संघाने केलेला खेळ पाहून, असं वाटू लागलं होतं की आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील दुसऱ्याच सामन्यात मोठा उलटफेर होणार. मात्र शेवटी आंद्रे रसेल आणि रोस्टन चेजने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्यात वेस्टइंडिजचा निम्मा संघ अवघ्या ९७ धावांवर माघारी परतला होता. मात्र आंद्रे रसेल आणि चेजने चौकार आणि षटकार खेचत १९ व्या षटकात वेस्टइंडिजला विजयाचं खातं उघडून दिलं. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पापुआ न्यू गिनीने २० षटकअखेर १३६ धावा केल्या.

WI vs PNG: पापुआ न्यू गिनीने वेस्टइंडिजला फोडला घाम! अटीतटीच्या लढतीत कसाबसा  ५ विकेट्सने मिळवला विजय
IPL 2025 Mega Auction: मेगा ऑक्शनमध्ये किती खेळाडूंना रिटेन करता येणार? फ्रेंचाईजींचं टेन्शन वाढलं!

वेस्टइंडिजकडून डावाची सुरुवात करताना ब्रँडन किंगने ३४ धावांची खेळी करत चांगली सुरुवात करून दिली. जॉन्सन चार्ल्स दुसऱ्याच षटकात बाद होऊन माघारी परतला. याच षटकात पाऊस आला आणि २० मिनिट खेळ थांबला. जॉन्सन चार्ल्स बाद झाला असला तरीदेखील ब्रँडन किंगने आपली फलंदाजी सुरूच ठेवली. वेस्टइंडिजकडून चेजने २७ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि २ षटकार खेचले. तो नाबाद राहिला आणि आंद्रे रसेलसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. शेवटी आंद्रे रसेल १५ धावांवर नाबाद राहिला. दोन्ही फलंदाजांनी मिळून वेस्टइंडिजला ५ गडी आणि ६ चेंडू राखून विजय मिळवून दिला.

WI vs PNG: पापुआ न्यू गिनीने वेस्टइंडिजला फोडला घाम! अटीतटीच्या लढतीत कसाबसा  ५ विकेट्सने मिळवला विजय
IPL 2024 Final: सारखा स्कोर सारखं चेज! IPLच्या दोन फायनल स्क्रिप्टेड की योगायोग?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com