टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला येत्या २ जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सराव सामन्यांचा थरार सुरू आहे. वेस्टइंडिज आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात वेस्टइंडिजने ऑस्ट्रेलियाचा ३५ धावांनी धुव्वा उडवला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी गरज असलेल्या वेस्टइंडिजकडून तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाने नाण्याचे जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या वेस्टइंडिजने २० षटकअखेर ४ गडी बाद २५७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला अवघ्या २२२ धावांपर्यंत मजल मारत आली.
ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये खेळवली जात आहे. त्यामुळे वेस्टइंडिजलाही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. वेस्टइंडिजचा संघही इतर संघांना कडवी झुंज देऊ शकतो, हे त्यांनी पहिल्याच सराव सामनात दाखवून दिलं आहे. वेस्टइंडिजकडून प्रथम फलंदाजी करताना निकोसल पुरनने २५ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ७५ धावांची वादळी खेळी केली. यादरम्यान त्याने ३०० च्या स्ट्राईकरेटने धावा केल्या. यासह कर्णधार रोमन पॉवेलने २५ चेंडूंचा सामना करत ४ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ५२ धावा चोपल्या. या खेळीच्या बळावर वेस्टइंडिजने २५७ धावांचा डोंगर उभारला.
ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी २५८ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघ २२२ धावांवर गारद झाला. सलामीला आलेल्या डेव्हिड वॉर्नर आणि एगरला अवघ्या २३ धावा जोडता आल्या. डेव्हिड वॉर्नर १५ धावा करत तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना टीम डेव्हिडने आणि जोश इंग्लिसने मिळून ५३ धावा जोडल्या. त्यानंतर टीम डेव्हिड २५ धावा करत माघारी परतला. ऑस्ट्रेलियाला २० षटकअखेर ७ गडी बाद २२२ धावा करता आल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.