IPL 2024 Playing XI: IPL 2024 स्पर्धेतील सर्वोत्तम प्लेइंग 11! तुम्हाला काय वाटतं?

IPL 2024 Best Playing XI: आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने जेतेपदाला गवसणी घातली आहे. दरम्यान जाणून घ्या या स्पर्धेतील सर्वोत्तम प्लेइंग ११
IPL 2024 Playing XI: IPL 2024 स्पर्धेतील सर्वोत्तम प्लेइंग 11! तुम्हाला काय वाटतं?
IPL 2024 Playing XI Of the season saam tv news

नुकताच आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना पार पडला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबादने फायनलमध्ये प्रवेश केला. हैदराबादचा संघ संपूर्ण स्पर्धेत चॅम्पियनसारखा खेळला मात्र फायनलमध्ये या संघाला कोलकाताकडून पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात फलंदाजांसह गोलंदाजांचाही जलवा पाहायला मिळाला. दरम्यान पाहा आयपीएल २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची प्लेइंग ११

ट्रेविस हेड -

प्लेऑफमध्ये ट्रेविस हेडची बॅट शांत राहिली असली तरीदेखील संपूर्ण हंगामात त्याच्या फलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला आहे. त्याने हैदराबाद संघाला प्लेऑफमध्ये पोहचवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. स्पर्धेतील १५ सामन्यांमध्ये त्याने ४०.५ च्या सरासरीने ५६७ धावा केल्या आहेत.

सुनील नरेन-

आक्रमक फलंदाजी आणि शानदार गोलंदाजीच्या बळावर सुनील नरेनने आयपीएल २०२४ स्पर्धेत प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला आहे. या स्पर्धेतील १५ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने ४८७ धावा केल्या. तर गोलंदाजी करताना त्याने १७ गडी बाद केले.

विराट कोहली -

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट या हंगामातही चांगलीच तळपली. त्याने या स्पर्धेतील १५ सामन्यांमध्ये सर्वाधिक ७४१ धावा केल्या. या हंगामात तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला.

संजू सॅमसन - (कर्णधार, यष्टीरक्षक)

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संजू सॅमसनने आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायर २ पर्यंत मजल मारली. मात्र या संघाला फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. त्याने यष्टीरक्षक, फलंदाजी आणि नेतृत्वात चांगली कामगिरी केली.

IPL 2024 Playing XI: IPL 2024 स्पर्धेतील सर्वोत्तम प्लेइंग 11! तुम्हाला काय वाटतं?
Rinku Singh Statement: '१०- १५ रुपयांसाठी तरसायचो, आता ५५ लाख..', IPL च्या मानधनाबाबत रिंकू सिंगचं मोठं वक्तव्य

रियान पराग

गेल्या काही हंगामात जोरदार ट्रोल केला गेलेल्या रियान परागने आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार फलंदाजी केली. त्याने या स्पर्धेतील १६ सामन्यांमध्ये ५७३ धावा केल्या.

शशांक सिंग-

लिलावात चुकून निवडला गेलेल्या शशांक सिंगने आयपीएल २०२४ स्पर्धेत चांगलाच भाव खालला. पंजाब किंग्ज संघाला जेव्हा जेव्हा गरज होती, तेव्हा शशांकने लक्षवेधी खेळी केली. त्याने या स्पर्धेतील १४ सामन्यांमध्ये ३५४ धावा केल्या.

आंद्रे रसल-

कोलकाताला जेतेपद मिळवून देण्यात आंद्रे रसेलनेही मोलाची भूमिका बजावली आहे. त्याने या स्पर्धेत गोलंदाजी करताना २२२ धावा केल्या. तर गोलंदाजीत १९ गडी बाद केले.

जसप्रीत बुमराह-

भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने देखील आपली लय कायम ठेवली. त्याने मुंबई इंडियन्ससाठी खेळताना १३ सामन्यांमध्ये २० गडी बाद केले.

ट्रेन्ट बोल्ट-

आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ट्रेन्ट बोल्टने या हंगामातही फलंदाजांना चांगलच नाचवलं. त्याने या स्पर्धेतील १६ सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना १६ गडी बाद केले.

वरुण चक्रवर्ती -

मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरुण चक्रवर्तीने कोलकाता नाईट रायडर्स संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली . त्याने १५ सामन्यांमध्ये २१ गडी बाद केले.

हर्षित राणा -

हर्षित राणाला कोलकाता नाईट रायडर्सने शोधून काढला आहे. शेवटच्या षटकांमध्ये जेव्हा जेव्हा संघाला गरज होती. त्यावेळी त्याने ब्रेकथ्रू मिळवून दिले. त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं. तर त्याने १३ सामन्यांमध्ये १९ गडी बाद केले.

IPL 2024 Playing XI: IPL 2024 स्पर्धेतील सर्वोत्तम प्लेइंग 11! तुम्हाला काय वाटतं?
T20 World Cup 2024: IPL संपली आता रंगणार टी-२० वर्ल्डकपचा थरार! केव्हा होणार टीम इंडियाचे सामने?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com