ind vs sa 3rd odi google
क्रीडा

Ind vs Sa 3rd ODI, Weather Update: भारत- द.आफ्रिका निर्णायक वनडे सामना रद्द होणार? कसं असेल हवामान?

Ankush Dhavre

IND vs SA 3rd ODI Weather Update:

भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम लढतीसाठी सज्ज झाला आहे. या दोन्ही संघांमध्ये खेळला जाणारा तिसरा वनडे सामना पार्लच्या बोलॅंड पार्कमध्ये रंगणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने जोरदार विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार कमबॅक केलं आणि भारतीय संघावर विजय मिळवला. सध्या ही मालिका १-१ ने बरोबरीत आहे.

कसं असेल हवामान?

ही मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे मालिकेतील अंतिम सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक असणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो मालिका जिंकेल. या सामन्यादरम्यान कसं असेल हवामान? जाणून घ्या.

या सामन्यादरम्यान हवामान ३६ अंश सेल्सिअस इतका असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पावसाचा एक थेंबही पडणार नाही, अशी शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना ५०-५० षटकांचा पूर्ण सामना पाहायला मिळेल. (Latest sports updates)

पिच कोणाला साथ देणार?

हा सामना बोलँड पार्कच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या मैदानावरील खेळपट्टी देखील फलंदाज आणि गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. सुरुवातीचे १० षटक ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. यादरम्यान गोलंदाजांना स्विंग मिळतो. १०-१५ षटकांचा खेळ झाल्यानंतर, फलंदाजांना मदत मिळायला सुरुवात होते. त्यानंतर फलंदाजी करणं सोपं होतं.

गोलंदाजीत बदल होणार का?

या सामन्यासाठी गोलंदाजी क्रमात बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण भारतीय गोलंदाज शानदार खेळ करताना दिसून येत आहेत. या सामन्यातही गोलंदाजीची धुरा अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि आवेश खान यांच्या हाती असेल.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन , तिलक वर्मा/ रजत पाटीदार, केएल राहुल ( कर्णधार), संजू सॅमसन , रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT