Team India Captaincy: 'आता सांगायची गरज काय? 'T-20 WC च्या नेतृत्वावरुन जय शाह यांचं मोठं वक्तव्य; रोहितबाबत बोलताना म्हणाले...

Jay Shah Statement On Rohit Sharma Captaincy: रोहित शर्माचा नेतृत्वाबाबत काय प्लान आहे आणि हार्दिक पंड्या केव्हा कमबॅक करणार? याबाबत जय शाह यांनी खुलासा केला आहे.
Rohit-sharma-wit-hardik-pandya
Rohit-sharma-wit-hardik-pandyasaam tv news
Published On

Team India Captain For T20 World Cup 2024:

हार्दिक पंड्या हा भारतीय संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेदरम्यान गोलंदाजी करत असताना तो दुखापतग्रस्त झाला होता. या कारणामुळे त्याला वर्ल्डकप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.

त्याच्याकडे भारताच्या टी-२० संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. मात्र त्याच्या अनुपस्थितीत रोहितला कर्णधारपद दिलं जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान रोहित शर्माचा नेतृत्वाबाबत काय प्लान आहे आणि हार्दिक पंड्या केव्हा कमबॅक करणार? याबाबत जय शाह यांनी खुलासा केला आहे.

वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या लिलावादरम्यान जय शाह म्हणाले की,'आता याबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज आहे का? टी-२० वर्ल्डकप जूनमध्ये सुरु होणार आहे. या स्पर्धेपूर्वी आयपीएल आणि अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळली जाणार आहे. आम्ही हार्दिक पंड्यावर लक्ष देऊन आहोत. तो एनसीएमध्ये असून प्रचंड मेहनत घेत आहे. तो फिट होताच आम्ही तुम्हाला योग्यवेळी कळवू. तो अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेच्या आधीही फिट होऊ शकतो.'

माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला होता की,रोहित शर्माने आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत खेळावं अशी बीसीसीआयची इच्छा आहे. तर रोहितकडून याबाबत स्पष्टीकरणही आलं होतं. तो म्हणाला होता की,' जर तुम्ही माझी टी-२० वर्ल्डकपसाठी निवड करणार असाल तर त्यासंबंधी माहिती मला आत्ताच द्या.' (Latest sports updates)

Rohit-sharma-wit-hardik-pandya
IND vs SA: ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका गाजवणाऱ्या खेळाडूला सूर्या बसवणार बाहेर; प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं कठीण?

सूर्याकडे टी -२० संघाची जबाबदारी..

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवची भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही सूर्यकुमार यादवची भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. या मालिकेत भारतीय संघाने ४-१ ने बाजी मारली होती.

Rohit-sharma-wit-hardik-pandya
Pro Kabaddi 2023: बेंगळुरू बुल्सचा पराभवाचा चौकार! अटीतटीच्या लढतीत हरियाणा स्टीलर्सने ६ गुणांनी मारली बाजी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com