IND vs SA 3rd ODI: निर्णायक लढत जिंकण्यासाठी टीम इंडियाचा मास्टरप्लान! विराटच्या या खास प्लेअरला देणार प्लेइंग ११ मध्ये स्थान

India vs South Africa 3rd Playing XI Prediction: आता अंतिम अंतिम सामना जिंकून दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची समान संधी असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल केले जाऊ शकतात.
team india
team indiagoogle
Published On

India vs South Africa, 3rd ODI Playing XI:

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि अंतिम वनडे सामना आज (२१ डिसेंबर) खेळला जाणार आहे. हा सामना पार्लच्या बोलॅंड पार्कमध्ये रंगणार आहे. सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे.

पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली होती. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव करत मालिकेत कमबॅक केलं.

आता अंतिम अंतिम सामना जिंकून दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची समान संधी असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल केले जाऊ शकतात.

मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळालं होतं. मात्र भारताचा संपूर्ण डाव अवघ्या २११ धावांवर आटोपला.

हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने ४२.३ षटकात ८ गडी शिल्लक ठेऊन पूर्ण केलं. त्यामुळे जर भारताला अंतिम सामना जिंकायचा असेल तर फलंदाजीत चुका करणं टाळावं लागणार आहे. यापूर्वी झालेली टी -२० मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली होती. आता भारतीय संघाकडे वनडे मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

प्लेइंग ११ मध्ये बदल होणार का?

मालिकेतील पहिल्या सामन्यात तर भारतीय गोलंदाज चमकले होते. त्यानंतर केएल राहुल आणि साई सुदर्शनच्या अर्धशतकांच्या बळावर भारताने सहज विजय मिळवला. मात्र दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही.

या सामन्यात तिलक वर्माही नावाला साजेशी खेळी करू शकला नाही. त्यामुळे तिसऱ्या वनडेतून त्याचा पत्ता कट होऊ शकतो. त्याच्या जागी रजत पाटीदारला संघात स्थान दिलं जाऊ शकतं. तिलक वर्माला या सामन्यात अवघ्या १० धावा करता आल्या. (Latest sports updates)

team india
IPL Player Earnings: कोट्यवधींची बोली लागणाऱ्या IPL खेळाडूंना इनहॅन्ड किती मिळतात?

दमदार गोलंदाजी..

या सामन्यासाठी गोलंदाजी क्रमात बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण भारतीय गोलंदाज शानदार खेळ करताना दिसून येत आहेत. या सामन्यातही गोलंदाजीची धुरा अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि आवेश खान यांच्या हाती असेल.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११

ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन , तिलक वर्मा/ रजत पाटीदार, केएल राहुल ( कर्णधार), संजू सॅमसन , रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान

team india
IPL Auction 2024: रेकॉर्ड ब्रेकिंग! ७२ खेळाडूंवर लागली २३० कोटींची बोली; लिलावानंतर असे आहेत सर्व १० संघ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com