KL Rahul Statement: नेमकं चुकलं तरी कुठं? दारुण पराभवानंतर केएल राहुलने सांगितलं कारण

India vs South Africa 2nd ODI: रत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसऱ्या दक्षिण आफ्रिकेने भारताचा ८ गडी राखून पराभव केला आहे.
kl rahul statement
kl rahul statementgoogle
Published On

India vs South Africa 2nd ODI, KL Rahul Statement:

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने जोरदार विजय मिळवला होता. आता मालिकेतील दुसऱ्या दक्षिण आफ्रिकेने भारताचा ८ गडी राखून पराभव केला आहे.

यासह मालिकेत १-१ ची बरोबरी देखील साधली आहे. त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना हा निर्णायक सामना असणार आहे. दरम्यान या सामन्यात नेमकं चुकलं तरी कुठं? काय आहे पराभवाचं कारण? याबाबत भारतीय कर्णधार केएल राहुलने वक्तव्य केलं आहे. (KL Rahul)

सामन्यानंतर बोलताना केएल राहुल म्हणाला की, ' या सामन्यात नाणेफेक अतिशय महत्वाचं ठरलं आहे. पहिल्या डावात खेळपट्टीतून मदत मिळत होती, त्यामुळे फलंदाजी करणं खूप कठीण होतं. हेच कारण होतं की, आमच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. साई सुदर्शन खेळपट्टीवर टिकून होता. त्यावेळी त्याच्याकडे संधी होती, शतकी खेळी करण्याची आणि संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत घेऊन जायची. असं झालं असतं तर आम्हाला ५०-६० धावा मिळाल्या असत्या. त्यामुळे आम्हाला धावांचा बचाव करणं सोपं गेलं असतं.

तसेच तो पुढे म्हणाला की, ' जर आम्ही कमीत कांक २४० धावांपर्यंत पोहोचलो असतो तर सामन्याचं चित्र बदलू शकलो असतो. मात्र दुर्दैवाने आमचे फलंदाज बाद होत राहिले. सर्व खेळाडूंकडे आपला गेम प्लान असणं गरजेचं आहे. संघाचा गेम प्लान वेगळा असतो. पण मला असं वाटतं की, सर्वांनी आपल्या गेम प्लाननुसारच खेळावं. अशाने आपल्यावर दबाव येत नाही. ' (Latest sports updates)

kl rahul statement
SA vs IND 2nd ODI: टोनी डी जॉर्जीकडून टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई; दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय, मालिकेतही साधली बरोबरी

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आवाहन दिले होते. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना साई सुदर्शनने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ५६ धावा केल्या. भारतीय संघाचा डाव २११ धावांवर संपुष्टात आला. दरम्यान या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून जोर्जीने सर्वाधिक ११९ धावांची खेळी केली. तर हेंड्रिक्सने ५२ धावा करत भारतीय संघाकडून हा सामना हिसकावून घेतला.

kl rahul statement
IPL 2024: वर्ल्डकप फायनलमध्ये टीम इंडियाला नडणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ३ खेळाडूंना IPL ने केलं मालामाल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com