SA vs IND 2nd ODI: टोनी डी जॉर्जीकडून टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई; दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय, मालिकेतही साधली बरोबरी

SA vs IND 2nd ODI : मंगळवारी झालेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर ८ गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाने दिलेले २१२ धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने ४२.३ षटकात पूर्ण केलं.
SA vs IND 2nd ODI:
SA vs IND 2nd ODI:twitter
Published On

India vs South Africa 2nd ODI:

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावं लागलं. मंगळवारी झालेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर ८ गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाने दिलेले २१२ धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने ४२.३ षटकात पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाबरोबर मालिकेत बरोबरी साधली आहे. (Latest Marathi News)

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर टोनी डी जॉर्जीच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाला पराभूत केलं. टोनीने १२२ चेंडूत ११९ धावा केल्या. या शतकी खेळीत ९ चौकार आणि ६ षटकाचा सामावेश आहे. जॉर्जीने एकदिवसीय करिअरमधील पहिलं शतक ठोकलं.

SA vs IND 2nd ODI:
IPL 2024: वर्ल्डकप फायनलमध्ये टीम इंडियाला नडणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ३ खेळाडूंना IPL ने केलं मालामाल

दक्षिण आफ्रिकेची चांगली सुरुवात

टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेच्या जॉर्जी आणि रीज हेंड्रिक्स यांनी दोघांनी मिळून १३० धावांची भागीदारी रचली. २८ व्या षटकात हेंड्रिक्स बाद झाला. तर जॉर्जी आणि रासीने दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागादारी रचली. जॉर्जीने ४२ व्या षटकात विजयी षटकार लगावत सामना खिशात टाकला.

SA vs IND 2nd ODI:
Rovman Powell Networth: आयपीएलच्या बोलीने आयुष्य बदललं; वेस्ट इंडिजचा ३० वर्षीय खेळाडू एका झटक्यात झाला कोट्यधीश

टीम इंडियासाठी साई सुदर्शनने ठोकल्या सर्वाधिक धावा

तत्पूर्वी, टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, टीम इंडियाने ४६. २ षटकात सर्वबाद २११ धावा केल्या. टीम इंडियासाठी साई सुदर्शनने ६२ धावा केल्या. त्याने ८३ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार लगावला.

कर्णधार केएल राहुलने ६४ चेंडूत ७ चौकाराच्या मदतीने ५६ धावा कुटल्या. सुदर्शन आणि राहुलने तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचली. इतर खेळाडूंनी फारशी कमाल केली नाही. टीम इंडियाने १६९ धावांवर ६ गडी गमावले होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com