भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर जोरदार विजय मिळवला आहे.
या विजयासह भारतीय संघाने वनडे मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी दमदार गोलंदाजी केली. या गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेचा डाव ११६ धावांवर संपुष्टात आला.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून साई सुदर्शनने पदर्पणातच अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने १६.४ षटकात विजय मिळवला. या विजयानंतर कर्णधार केएल राहुल खूश असल्याचं दिसून आलं आहे. हा सामना जिंकून केएल राहुल हा दक्षिण आफ्रिकेला पिंक वनडेत पराभूत करणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. (KL Rahul Statement)
या सामन्यात विजय मिळवल्यानंतर केएल राहुलने आपल्या रणनितीबद्दल खुलाला केला आहे. तो म्हणाला की, 'कर्णधार म्हणून ३ सामने गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत मिळवलेल्या या विजयाचा मला प्रचंड आनंद झाला आहे. आम्हाला या सामन्यात फिरकी गोलंदाजांचा वापर करायचा होता. मात्र सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती. त्याचा गोलंदाजांनी चांगलाच फायदा घेतला. आधी टी-२०,वनडे आणि मग कसोटी मालिका होणार आहे. याच मालिकेतील कामगिरीनूसार संघाची निवड केली जाणार आहे. मात्र आम्ही त्याच खेळाडूंना संधी देणार आहोत, त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे.' (Latest sports updates)
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय मात्र हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. भारतीय गोलंदाजी आक्रमणापुढे दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज गुडघे टेकताना दिसून आले. दक्षिण आफ्रिकेचा संपुर्ण डाव अवघ्या ११६ धावांवर संपुष्टात आला. (India vs South Africa)
भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर आवेश खानने ४ आणि कुलदीप यादवने १ गडी बाद केला. त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून श्रेयस अय्यर आणि साई सुदर्शनने फलंदाजीत जलवा दाखवत अर्धशतकी खेळ्या केल्या आणि भारतीय संघाला १६.४ षटकात विजय मिळवून दिला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.