Women's Team India Yandex
Sports

IND vs PAK, Asia Cup 2024: भारत- पाकिस्तान सामना रद्द होणार? समोर आली मोठी अपडेट

India vs Pakistan Women's Asia Cup Match, Weather Update: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आशिया चषकातील सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी मोठी अपडेट समोर येत आहे.

Ankush Dhavre

भारतीय महिला क्रिकेट संघ आशिया चषक २०२४ स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेचा थरार श्रीलंकेत रंगणार आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ हा सामना जिंकून स्पर्धेत विजयी सलामी देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट फॅन्सचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारतीय महिलांनी आतापर्यंत ७ वेळेस आशिया चषकाची ट्रॉफी उंचावली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्याने करणार आहे. भारतीय संघाचा ग्रुप ए मध्ये समावेश करण्यात आला आहे. या गटात युएई, नेपाळ आणि पाकिस्तान या संघांचा समावेश आहे. साखळी फेरीतील टॉप २ मध्ये असणारे संघ थेट सेमिफायनलमध्ये प्रवेश करणार आहेत.

कसं असेल हवामान?

या स्पर्धेत भारतीय संघाचे सर्व सामने रंगिरी दांबुला आतंरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार, १९ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल. सकाळच्या वेळी तापमान २८ डिग्रीच्या आसपास असेल. यासह जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. संध्याकाळच्या वेळी जोरदार हवा असेल. यासह पाऊस पडण्याची शक्यता केवळ २ टक्के इतकी असणार आहे. सामन्यावेळी पाऊस पडणार नसला, तरीदेखील खेळपट्टी ओली असल्यामुळे सामना सुरु व्हायला उशिर होऊ शकतो.

या मैदानावर कसा राहिलाय रेकॉर्ड?

या स्टेडियमवरील रेकॉर्ड पाहिला, तर आतापर्यंत ६ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी ४ सामने जिंकले आहेत. तर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने २ सामने जिंकले आहेत. या मैदानावरील सरासरी धावसंख्या पाहिली, तर प्रथम फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या १५९ इतकी आहे. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या १४१ इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

Diet Tips: वजन कमी करण्यासाठी कोणती पोळी खावी?

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना

अलख निरंजन! डार्क वेबवर कोड वापरून ड्रग्सची तस्करी करणारी टोळी, पुणे पोलिसांनी उघडकीस आणलं आंतरराष्ट्रीय नेक्सस

Heart Attack Risk: डायबेटीज, बीपी आणि इन्फेक्शनमुळं वाढतो हार्ट अटॅकचा धोका; तज्ज्ञांनी नेमक्या कोणत्या गोष्टी सांगितल्या?

SCROLL FOR NEXT