Asia Cup 2024 : महिला आशिया चषकाच्या तारखा जाहीर! वाचा संपूर्ण वेळापत्रक

Womens Asia Cup 2024 : आशियाई क्रिकेट परिषदेकडून महिला आशिया चषकाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी एकूण ८ संघ या स्पर्धेत खेळणार आहेत.महिला आशिया चषक २०२४ मध्ये एकूण दोन गट असतील.
Womens Asia Cup  2024
Womens Asia Cup 2024

Asian Cricket Council Announced Womens Asia Cup 2024 :

आयपीएलचं १७ वे सत्र चालू असतानाचा महिला आशिया चषकाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. आशियाई क्रिकेट परिषदेकडून या स्पर्धेच संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.श्रीलंकेतील दांबुला याठिकाणी महिला आशिया चषकाचे सर्व सामने खेळले जातील. हे सामने १९ ते २८ जुलै यादरम्यान होतील. (Latest News)

यावर्षी एकूण ८ संघ या स्पर्धेत खेळणार आहेत.महिला आशिया चषक २०२४ मध्ये एकूण दोन गट असतील. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, यूएई आणि नेपाळ हे संघ असतील. तर ग्रुप बी मध्ये बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया आणि थायलंड हे संघ असतील.या संघामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, युएई, मसेशिया, नेपाळ आणि थायलँड हे संघ असतील. तत्पूर्वी महिला आशिया चषक २०२२ मध्ये ७, तर २०१८ साली या स्पर्धेत ६ संघांनी भाग घेतला होता.

टुर्नामेंटमध्ये दररोज दोन सामने खेळले जाणार आहेत. १९जुलै रोजी पाकिस्तानविरुद्ध नेपाळ आणि भारतविरुद्ध यूएई असे सामने खेळले जातील. २० जुलै रोजी नेपाळविरुद्ध यूएई आणि भारतविरुद्ध पाकिस्तान हा सामना होणार आहे. २२ जुलै रोजी श्रीलंकाविरुद्ध मलेशिया आणि बांगलादेशविरुद्ध थायलँड सामना होईल. २३ जुलै रोजी पाकिस्तानविरुद्ध यूएई आणि भारतविरुद्द नेपाळ हे सामने खेळले जातील. २४ जुलै रोजी बांगलादेश विरुद्ध मलेशिया आणि श्रीलंका विरुद्ध थायलंड सामना होणार आहे.

Womens Asia Cup  2024
IPL 2024: एक नंबर! 'रॉकेट मॅन बनत धोनीने घेतला गजब कॅच; चपळता पाहून प्रेक्षक अवाक

यानंतर २६ जुलै रोजीपासून उपांत्य फेरीतील सामन्यांना सुरुवात होईल. पहिला उपांत्य सामना ग्रुप ए मधील पहिला संघ विरुद्ध ग्रुप बी मधील दुसऱ्या क्रमांकावरील संघात होईल. दुसरा उपांत्य सामना ग्रुप बी मधील पहिला संघ आणि ग्रुप ए मधील दुसऱ्या संघात खेळला जाईल. २७ जुलै रोजी एकही सामना खेळला जाणार नाही. अंतिम सामन्यासाठी मात्र दोन्ही संघ सज्ज असतील, अंतिम सामना २८ जुलै रोजी आयोजित करण्यात आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com