IPL 2024: एक नंबर! 'रॉकेट मॅन बनत धोनीने घेतला गजब कॅच; चपळता पाहून प्रेक्षक अवाक

MS Dhoni Catch: यंदाच्या आयपीएल सत्रात एम एस धोनी चेन्नई सुपर किंग्स च्या कर्णधारपदावरून पायउतार झाला.धोनी जबाबदारीतून मुक्त जरी झाला तरी तो त्याच्या कर्तव्यातून मुक्त झाला नाहीये. कर्णधार पद सोडले असले तरी सर्वत्र एम एस धोनीची चर्चा होतेय.
IPL 2024:  एक नंबर! 'रॉकेट मॅन बनत धोनीने घेतला गजब कॅच; चपळता पाहून प्रेक्षक अवाक
cnbc

Ipl 2024 Csk Vs Gt Ms Dhoni Catch Of Vijay Shankar :

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या गुजरात टायटन्स आणि सीएसकेच्या संघात सामना झाला. याॉ सामन्यात चेन्नईने ६३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या संघाने २०६ धावांचं मोठं आव्हान गुजरात संघासमोर ठेवलं.चेन्नईच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. (Latest News)

दमदार फलंदाजी केल्यानंतर चेन्नईच्या संघाने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही कमालीचं प्रदर्शन केलं. यादरम्यान एम एस धोनीने घेतलेला झेल पाहून अनेकजण थक्क झाले. आज झालेल्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सच्या सामन्यात धोनीने कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. गुजरातविरुद्धच्या सामन्यात माही म्हणजेच एम एस धोनी त्याच्या चपळाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुजरातविरुद्धच्या सामन्यात अप्रतिम झेल घेऊन माही त्याच्या चपळाईमुळे पुन्हा चर्चेत आला. वयाच्या ४२ व्या वर्षी त्याने टिपलेला झेल पाहून अनेकांना धक्का बसला. कॅप्टन कूलने झेल घेताच मैदानात धोनीच्या नावाचा आवाज दुमदुमू लागला. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गुजरात टायटन्सचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर सीएसकेचं आव्हान पार करण्यासाठी क्रीजवर आपले रोवून उभा होता. आपल्या संघासाठी एक-एक धाव तो जोडत होता. विजय तेथे उपस्थित राहणं सीएसकेसाठी धोक्याचं ठरलं असतं त्यामुळे त्याची विकेट घेणं सीएसकेच्या गोलंदाजांचंा मुख्य उद्देश झाला होता. त्यात डेरिल मिशेलला यश मिळाले. मिशेलने विजय शंकरला झेलबाद करत सीएसकेला आणखीन यश मिळवून दिलं.

मिशेलने टाकलेल्या चेंडूवर विजयने जोरात फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु बॅटचा खालच्या भागाला स्पर्श करत चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. हा चेंडू धोनीपासून काही अंतरावर होता. जर प्रयत्न केला झेल होऊ शकतो, असा विचार करत धोनीने हा अविश्वसनीय झेल घेतला. धोनीने हा झेल घेण्यासाठी २.२७ मीटर इतक स्वत: ला स्ट्रेच केले.

यानंतर चेन्नईचे सर्व खेळाडू आनंदाने उड्या मारून माहीचे अभिनंदन करताना दिसले. कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेला धोनी वयाच्या ४२ वर्षीही फिट अॅण्ड फाइन आहे. धोनीचा हा झेल पाहून त्याचा बेस्ट फ्रेंड सुरेश रैना देखील खूश झाला. धोनीचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 'सर हे लक्षात ठेवा, माही भाई नेहमीच मजबूत राहतो आणि सर्वांना प्रेरणा देत असतो.' असं रैनाने आपल्या पोस्टवर लिहिले आहे.

IPL 2024:  एक नंबर! 'रॉकेट मॅन बनत धोनीने घेतला गजब कॅच; चपळता पाहून प्रेक्षक अवाक
CSK vs GT IPL 2024 : छा गये दुबे जी! दुबेने गुजरातच्या गोलंदाजांना धु.. धु.. धुतलं; गुजरातसमोर २०७ धावांचं आव्हान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com