CSK vs GT IPL 2024 : छा गये दुबे जी! दुबेने गुजरातच्या गोलंदाजांना धु.. धु.. धुतलं; गुजरातसमोर २०७ धावांचं आव्हान

CSK vs GT IPL 2024 : चेपॉक स्टेडियमवर सीएसकेने गुजराच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. सीएसकेने गुजरातसमोर धावांचं डोंगर उभारत थेट २०७ धावांचं आव्हान दिलंय.
CSK vs GT  IPL 2024
CSK vs GT IPL 2024 X

Ipl 2024 Chennai Super Kings Vs Gujrat Titans :

आज इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सचे संघ आमनेसामने आहेत. चेन्नईचे होम ग्राउंड चेपॉक येथे सामना होत आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गिलचा हा निर्णय सपशेल चुकीचा ठरला. सीएसकेच्या संघाने गुजरातसमोर धावांचे २०७ धावांचे आव्हान ठेवलं.(Latest News)

चेन्नई सुपर किंग्सच्या चारही फलंदांजांनी गुजरातच्या गोलंदाजाना चोपलं. यात सर्वाधिक धावा शिवम दुबेने केल्या अवघ्या २२ चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केले. शिवम दुबेने २३ चेंडूत ५१ धावा केल्या.ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी ४६-४६ धावा केल्या. शेवटच्या षटकात समीर रिझवीनेही कमालीची फलंदाजी केली त्याने ६ चेंडूत १४ धावा काढल्या. आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

दरम्यान निर्धारिते २० षटकात सीएसकेच्या संघाने ६ गडी गमावत २०६ धावा केल्या. गुजरातकडून गोलंदाजी करताना राशीद खानने २ विकेट घेतल्या. तर आर साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com