IND vs PAK Match: भारत- पाकिस्तान महामुकाबल्यासाठी दोन्ही संघ सज्ज! केव्हा अन् कुठे पाहता येणार सामना?

India vs Pakistan Match at Womens Asia Cup 2024: भारत -पाकिस्तान सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. दरम्यान केव्हा अन् कुठे पाहता येतील सामने? जाणून घ्या.
IND vs PAK Match: भारत- पाकिस्तान महामुकाबल्यासाठी दोन्ही संघ सज्ज! केव्हा अन् कुठे पाहता येणार सामना?
ind vs pak yandex
Published On

महिला आशिया कप स्पर्धेला येत्या १९ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत भारती महिला संघाचा ग्रुप ए मध्ये समावेश करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये भारतीय संघासह, पाकिस्तान, युएई आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. दरम्यान बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान सामन्याचा थरार १९ जुलै रोजी रंगणार आहे. हा सामना श्रीलंकेतील दंबुलामध्ये खेळवण्यात येणार आहे.

भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेतील दंबुलामध्ये खेळवले जाणार आहेत. दोन्ही संघ जेव्हा आमनेसामने येतात त्यावेळी क्रिकेट फॅन्सला रोमांचक सामना पाहायला मिळत असतो. पुरुष क्रिकेटसह महिला क्रिकेटमध्येही भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे या सामन्यातही भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. भारतीय संघाचा गेल्या १७ सामन्यातील रेकॉर्ड पाहिला, तर या संघाने १० सामने जिंकले आहेत. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर २ सामने अनिर्णित राहिले आहेत.

IND vs PAK Match: भारत- पाकिस्तान महामुकाबल्यासाठी दोन्ही संघ सज्ज! केव्हा अन् कुठे पाहता येणार सामना?
Team India T20I Captain: सूर्या की हार्दिक? कर्णधारपदासाठी रोहितचा सपोर्ट कुणाला?

पाकिस्तान संघाचा गेल्या १ वर्षातील रेकॉर्ड पाहिला, तर या संघाने १९ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाने केवळ ६ सामने जिंकले आहेत. तर १२ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा रेकॉर्ड पाहिला, तर या संघाची सामने गमावण्याची सरासरी ही अधिक आहे.

IND vs PAK Match: भारत- पाकिस्तान महामुकाबल्यासाठी दोन्ही संघ सज्ज! केव्हा अन् कुठे पाहता येणार सामना?
Team India Captaincy: रोहितनंतर कोण होणार वनडे संघाचा कर्णधार? हे आहेत पर्याय

केव्हा अन् कुठे पाहता येणार सामने?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा आशिया चषक स्पर्धेतील सामना १९ जुलै रोजी खेळला जाणार आहे. हा सामना भारतात डिज्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहता येईल.

इथे पाहा लाईव्ह

या स्पर्धेतील सर्व सामने स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहेत.

कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

भारत आणिप पाकिस्तान यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर हे दोन्ही संघ १४ सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ११ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर केवळ ३ सामन्यांमध्ये पाकिस्तानला विजय मिळवता आला आहे. तर आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला, तर हे दोन्ही संघ ६ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ५ सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला केवळ १ सामन्यात विजय मिळवता आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com