काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे मंगळवारी (२२ एप्रिल) दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान किक्रेटच्या सामन्यांवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली आहे. २०१२ नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्याही एकही द्विदेशीय क्रिकेट मालिका झालेली नाही. पण आयसीसीच्या स्पर्धांमध्ये हे दोन संघ आमनेसामने येतात. काल झालेल्या हल्ल्यानंतर भारताने आयसीसी स्पर्धांमध्येही पाकिस्तान विरुद्ध खेळू नये अशी मागणी जोर धरत आहे.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पहलगाम येथील हल्ल्याचा निषेध केला आणि मृतकांना श्रद्धांजली वाहिली. यापुढे कधीही भारत-पाकिस्तान द्विदेशीय मालिका होणार नसल्याचे राजीव शुक्ला यांनी सांगितले. सरकार जे काही म्हणेल, ते आम्ही करु. सरकारच्या भूमिकेमुळे आम्ही पाकिस्तानसोबत द्विदेशीय मालिका खेळणार नाही, असे वक्तव्य बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी केले.
जेव्हा आयसीसी स्पर्धांचा विचार केला जाईल, तेव्हा आयसीसीच्या सहभागामुळे पाकिस्तान विरुद्धचे सामने खेळावे लागतात. आयसीसीला या संघर्षाबद्दल कल्पना आहे, त्यांनी या प्रकरणावर योग्य निर्णय घ्यावा असे राजीव शुक्ला यांनी स्पोर्ट्सतकला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनीही पहलगाम हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांसंदर्भात त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे पडसाद क्रिकेट जगतावरही पडत आहेत. पाकिस्तान विरोधात क्रिकेटचे सामने खेळू नये अशी मागणी देशभरातून होत आहे. यावर बीसीसीआयने भारत-पाकिस्तान द्विदेशीय सामने होणार नसल्याची घोषणा केली आहे. पण भारत विरुद्ध पाकिस्तान हे सामने आयसीसीमुळे अटळ असल्याचे संकेत बीसीसीआयने अप्रत्यक्षपणे दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.