shreyas iyer twitter
Sports

IND vs ENG: सरस अय्यर! दमदार कमबॅक अन् पहिल्याच सामन्यात इंग्लिश गोलंदाजांना चोपून काढलं

Shreyas Iyer, IND vs ENG 1st ODI: भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने वनडे संघात कमबॅक करताच शानदार अर्धशतकाची नोंद केली आहे.

Ankush Dhavre

नागपूरमध्ये पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २४९ धावांची गरज होती. हे आव्हान फार मोठं नव्हतं. मात्र सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्माला चांगली सुरुवात करुन देता आली नाही. सुरुवातीलाते दुहेरी धक्का बसल्यानंतर श्रेयस अय्यरने फलंदाजीला येऊन भारतीय संघाचा डाव सांभाळला.

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनलनंतर श्रेयस अय्यर पहिल्यांदाच मैदानात उतरला होता. भारतीय संघाला सुरुवातीला २ मोठे धक्के बसले होते. मात्र त्याने फलंदाजीला येताच इंग्लंडचा स्ट्रायकर गोलंदाज जोफ्रा आर्चरला टार्गेट केलं. आर्चरच्या एकाच षटकात अय्यरने सलग २ षटकात खेचले. त्यानंतर त्याने इतर गोलंदाजांवरही हल्ला चढवायला सुरुवात केली.

अय्यरचं वादळी अर्धशतक

अय्यर आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. या सामन्यातही त्याने आक्रमक फलंदाजी केली. संधी मिळताच त्याने चौकार आणि षटकार वसूल केले. त्याला नॉन स्ट्राईकला असलेल्या शुभमन गिलकडून चांगली साथ मिळाली. तब्बल १४ महिन्यांनंतर कमबॅक करत असलेल्या अय्यरने ३० चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह तो ३६ चेंडूत ५९ धावांची खेळी करत माघारी परतला.

इंग्लंडने केल्या २४८ धावा

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संपूर्ण डाव २४८ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. तर जेकब बेथलने ५१ आणि फिल सॉल्टने ४३ धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना रविंद्र जडेजा आणि हर्षित राणाने सर्वाधिक ३-३ गडी बाद केले. तर मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT