Shreyas Iyer : श्रेयस अय्यरचा मैदानात राडा, अंपायरशी घेतला पंगा, अजिंक्य रहाणेचही ऐकलं नाही; नेमकं काय घडलं? वाचा

Shreyas Iyer In Ranji Trophy Match : मुंबई आणि जम्मू-काश्मीर या दोन संघामधील रणजी ट्रॉफीचा सामना सुरु आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात श्रेयस अय्यरने अंपायरच्या निर्णयावर आक्षेप घेत वाद घालायला सुरुवात केली.
Shreyas Iyer In Ranji Trophy Match
Shreyas Iyer In Ranji Trophy Match PTI
Published On

Ranji Trophy Match : मुंबई आणि जम्मू-काश्मीर या दोन संघात रणजी ट्रॉफीचा सामना सुरु आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात श्रेयस अय्यर १७ धावांवर आउट झाला. श्रेयसने मारलेल्या फटक्यावर विकेटकिपर कन्हैया वाधवानने कॅच पकडली. अपील घेतल्यावर मैदानातील अंपायर एस रवी यांनी अय्यर बाद झाल्याचा निर्णय दिला. पण यावर अय्यरने आक्षेप घेतला आणि तो भर सामन्यात अंपायरशी वाद घालू लागला.

सामन्याच्या २१ व्या ओव्हरमध्ये आकिब नबीच्या दुसऱ्या बॉलवर श्रेयस अय्यरची कॅचआउट झाला. जम्मू-काश्मीरच्या संघाने अंपायर एस रवी यांच्याकडे अपील केले. त्यांनी श्रेयस अय्यरला आउट घोषित केले. पण विकेटकिपरने नीट कॅच पकडली नाही असे म्हणत मैदानात अंपायरशी वाद घालायला सुरुवात केली. तेव्हा नॉन स्ट्राइकला उभ्या असलेल्या अजिंक्य रहाणेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही अय्यर विकेट पडल्याचे मान्य करत नव्हता.

अशाच प्रकारे आधी सुद्धा श्रेयस अय्यरने अंपायरशी वाद घातला होता. तेव्हा सुद्धा श्रेयस अय्यर जम्मू-काश्मीर विरोधात खेळत होता. ८ धावा केल्यानंतर तो कॅचआउट झाला. तेव्हाही कॅच व्यवस्थित पडला गेला नाही असे अय्यरचे म्हणणे होते. आणि योगायोग म्हणजे तेव्हाही एस. रवी मैदानावर अंपायर होते.

Shreyas Iyer In Ranji Trophy Match
Sehwag Aarti Divorce: एकत्र राहत नाही, सोशल मीडियावरही केलंय अनफॉलो...; २० वर्षांनंतर वेगळे होणार सेहवाग-आरती?

मुंबई-जम्मू काश्मीरच्या रणजी सामन्यात मुंबईच्या संघाला चांगला खेळ करता आला नाही. पहिल्या डावात रोहित शर्माने ३, जैस्वालने ४, श्रेयस अय्यरने ११ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात रोहितने २८, जैस्वालने २६, अय्यरने १७ धावा केल्या आहेत. दोन्ही डावांमध्ये शार्दुल ठाकूरने शानदार कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या डावात ५१ धावा, तर दुसऱ्या डावात ११३* धावा केल्या आहेत.

Shreyas Iyer In Ranji Trophy Match
Ranji Trophy: पहिल्याच पेपरमध्ये नापास! रोहित ते गिल; पहिल्या दिवशी कोणी किती धावा केल्या?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com