Ranji Trophy: पहिल्याच पेपरमध्ये नापास! रोहित ते गिल; पहिल्या दिवशी कोणी किती धावा केल्या?

Ranji Trophy Updates: भारतीय संघातील स्टार खेळाडू रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. दरम्यान कोणत्या फलंदाजाने कशी कामगिरी केली? जाणून घ्या.
Ranji Trophy: पहिल्याच पेपरमध्ये नापास! रोहित ते गिल; पहिल्या दिवशी कोणी किती धावा केल्या?
SHUBMAN GILLtwitter
Published On

रणजी ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना आजपासून सुरुवात झाली. आजचा दिवस हा भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता. कारण रोहित शर्मा, श्रेयस अय्यर,रिषभ पंत ,शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालसारखे दिग्गज खेळाडू मैदानात उतरले.

रोहित शर्मा आऊट ऑफ फॉर्म आहे. त्यामुळे फॉर्ममध्ये परतण्यासाठी त्याने रणजी खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यात तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. रोहितला रणजी क्रिकेटमध्ये खेळताना पाहण्यासाठी बीकेसीचं स्टेडियम खचाखच भरलं होतं. मात्र रोहीत स्वस्तात माघारी परतला.

Ranji Trophy: पहिल्याच पेपरमध्ये नापास! रोहित ते गिल; पहिल्या दिवशी कोणी किती धावा केल्या?
IND vs ENG Record: इंग्लंडला नमवताच टीम इंडियाने रचला इतिहास! असा रेकॉर्ड करणारा ठरला दुसराच संघ

रोहितला अवघ्या ३ धावा जोडता आल्या. पण एकटा रोहित नव्हे, तर श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि रिषभ पंत देखील पहिल्याच पेपरमध्ये नापास झाले आहेत. एकट्या जयस्वालला सोडलं तर उर्वरित सर्व खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. त्यामुळे संघात स्थान कायम ठेवण्यासाठी हे खेळाडू रणजी खेळण्यासाठी मैदानात उतरले.

Ranji Trophy: पहिल्याच पेपरमध्ये नापास! रोहित ते गिल; पहिल्या दिवशी कोणी किती धावा केल्या?
IND vs ENG: गुरु तसा शिष्य! अभिषेकने मोठ्या रेकॉर्डमध्ये युवराज सिंगची केली बरोबरी

२०१५ नंतर पहिल्यांदाच रोहित उतरला मैदानात

रोहित शर्मा सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. दरम्यान १० वर्षानंतर पहिल्यांदाच तो रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरला. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकांमध्ये त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता. त्यामुळे फॉर्ममध्ये परतण्यासाठी त्याने रणजी खेळण्याचा पर्याय निवडला.

Ranji Trophy: पहिल्याच पेपरमध्ये नापास! रोहित ते गिल; पहिल्या दिवशी कोणी किती धावा केल्या?
IND vs ENG 1st T20I: 'वरुण'राजाच्या तडाख्यात इंग्लंड गेला वाहून; भारताला अवघ्या इतक्या धावांची गरज

कोणत्या फलंदाजाने किती धावा केल्या?

पहिल्याच दिवशी भारताच्या स्टार खेळाडूंचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. मुंबईकडून खेळत असलेल्या रोहित शर्माला ३, यशस्वी जयस्वाल ४, श्रेयस अय्यरला ११ धावा करता आल्या. तर शुभमन गिल ४ धावांवर बाद झाला. तर पंतला केवळ १ धाव करता आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com