
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला टी -२० सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकअखेर १३२ धावा केल्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १३३ धावांची गरज आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. अर्शदीप सिंगने इंग्लंडच्या सलामी जोडीला पॅव्हेलियनची वाट दाखवली. त्याने बेन डकेट आणि फिल सॉल्टला बाद करत माघारी धाडलं. एकीकडून विकेट्स जात होते, तर दुसरीकडे जोस बटलर तुफान फटकेबाजी करत होता.
बटलरने या डावात फलंदाजी करताना ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४४ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडचा डाव अवघ्या १३२ धावांवर आटोपला.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार सुरुवात करुन दिली. भारताकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने भारताला दमदार सुरुवात करुन दिली. त्याने सुरुवातीलाच २ गडी बाद करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. भारताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
इंग्लंडचा संघ: बेन डकेट, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टन, जेकब बेथेल, जेमी ओव्हर्टन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड
भारतीय संघाची प्लेइंग ११: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.