IND vs ENG: आज रंगणार पहिल्या टी-२० चा थरार! पाहा मॅच प्रेडिक्शन, पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११

India vs England 1st T20I Match Prediction, Playing 11 And Pitch Reports: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये आज पहिल्या टी-२० सामन्याचा थरार रंगणार आहे.
IND vs ENG: आज रंगणार पहिल्या टी-२० चा थरार! पाहा मॅच प्रेडिक्शन, पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११
IND VS ENG Cricket MatchTwitter
Published On

भारतीय संघ आज या वर्षातील पहिला टी -२० सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे.

या सामन्याला संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होईल. तर सामन्याचा नाणेफेक ६:३० वाजता होणार आहे. दरम्यान जाणून घ्या या सामन्याबद्दल संपूर्ण माहिती.

IND vs ENG: आज रंगणार पहिल्या टी-२० चा थरार! पाहा मॅच प्रेडिक्शन, पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११
IND vs ENG, Weather Update: भारत- इंग्लंड पहिला सामना रद्द होणार? काय आहे कारण

काय सांगतो या मैदानावरील रेकॉर्ड?

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला तर, दोन्ही संघ २४ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने १३ सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडला ११ सामने जिंकता आले आहेत. हा रेकॉर्ड पाहिला तर, भारतीय संघ वरचढ आहे. मात्र या मैदानावर खेळताना इंग्लंडने एकही सामना गमावलेला नाही.

या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये २ टी -२० सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामूळे हा रेकॉर्ड मोडून काढण्याचं आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.

IND vs ENG: आज रंगणार पहिल्या टी-२० चा थरार! पाहा मॅच प्रेडिक्शन, पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११
IND vs ENG: पहिल्या टी-२० सामन्यासाठी Playing XI ची घोषणा! कर्णधाराबाबत घेतला मोठा निर्णय

खेळपट्टी कोणाला देणार साथ?

ईडन गार्डन्सची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. पण अनेकदा या मैदानावर धावांचा डोंगर उभारला गेला आहे. ही खेळपट्टी पाहता, भारतीय संघ ३ फिरकी गोलंदाजांना घेऊन मैदानात उतरू शकतो.

नाणेफेक जिंकून काय घ्यावं?

भारत आणि इंग्लंड हे दोन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते. मात्र या मैदानावर धावांचा पाठलाग करताना सामना जिंकण्याची संधी अधिक आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.

IND vs ENG: आज रंगणार पहिल्या टी-२० चा थरार! पाहा मॅच प्रेडिक्शन, पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११
IND vs ENG, Live Streaming: जियो, हॉटस्टार नव्हे, इकडे फुकटात पाहा भारत- इंग्लंड मालिका

इंग्लंडने पहिल्या सामन्यासाठी जाहीर केलेली प्लेइंग ११:

बेन डकेट, फिल सॉल्ट (यष्टिरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिविंगस्टन, जेकब बेथेल, जेमी ओवरटन, गस एटकिंसन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद आणि मार्क वुड.

अशी असू शकते भारताची प्लेइंग ११:

संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवि बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि मोहम्मद शमी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com