Ind Vs Eng 1st ODI : पहिल्या वनडेतून विराट बाहेर की हकालपट्टी? कर्णधार रोहितने दिली माहिती

Ind Vs Eng 1st ODI Match Live : आज भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात विराट कोहलीला का वगळण्यात आले आहे याचे उत्तर रोहित शर्माने दिले.
Virat Kohli
Virat KohliX
Published On

Virat Kohli Ind Vs Eng 1st ODI : आज नागपूरमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड वनडे सामना सुरु आहे. तीन सामन्यांच्या सिरीजमधील पहिल्या सामन्यात भारतीय संघात विराट कोहलीला वगळण्यात आले आहे. दुपारी १.३० वाजता सामना सुरु झाला. सामना सुरु होण्यापूर्वी टॉसच्या वेळी रोहित शर्माने आजचा सामना विराट कोहली का खेळणार नाही याची माहिती दिली.

टॉससाठी रोहित शर्मा मैदानावर उतरला तेव्हा त्याने विराट आजचा सामना न खेळण्यामागचे कारण स्पष्ट केले. तो म्हणाला, विराटच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. यामुळे तो आज मैदानात दिसणार नाही. सामन्यात हर्षित राणा आणि यशस्वी जैस्वालला संधी दिल्याचेही रोहितने सांगितले. विराट खेळत नसल्याने शुबमन गिल त्याच्या जागेवर खेळणार असे ठरले आहे.

येत्या काही दिवसांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. अशात विराट कोहलीcला दुखापत झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आजचा सामना सुरु होण्यापूर्वी विराट गुडघ्याला पट्टी बांधून मैदानात फिरत होता. जुलै २०२२ नंतर पहिल्यांदाच दुखापतीच्या कारणामुळे विराटला वनडे संघातून वगळण्यात आले आहे.

आजच्या सामन्यातील प्लेईंग ११ -

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

Virat Kohli
Dwarkanath Sanzgiri: ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन; वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दरम्यान इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. पाच टी-२० सामन्यांमध्ये भारताच्या संघाने आघाडी घेत मालिकेत विजय मिळवला. टी-२० मालिकेनंतर ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. ही मालिका आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे.

Virat Kohli
Dinesh Karthik-Dipika Pallikal: पहिल्या बायकोकडून धोका, डिप्रेशन, ट्रेनिंगवेळी दीपिकाशी ओळख, पुढे मैत्री अन् प्रेम; दिनेश कार्तिकच्या दुसरी लव्हस्टोरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com