Dwarkanath Sanzgiri: ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन; वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dwarkanath Sanzgiri passed away: क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांनी त्यांच्या वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती होती.

क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घ आजाराने ग्रस्त होते. मुंबईतील लिलावती रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. संझगिरी पेशाने सिव्हिल इंजिनीयर होते. ते मुंबईच्या महापालिकेत उच्च पदावर कार्यरत देखील होते. मात्र क्रिकेट आणि मराठी साहित्यामधील रुचीने त्यांच्यातील क्रिकेट समीक्षक घडवला.

क्रिकेटचे समीक्षक म्हणून संझगिरी यांनी अनेक सामने कव्हर केले. स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा विविध विषयांवर 40 पुस्तकं लिहिली आहेत. १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी लेखन कारकिर्दीला सुरुवात केली होती.

संझगिरी लिहिलेली मराठी पुस्तकं

  • शतकात एकच - सचिन

  • चॅम्पियन्स

  • चित्तवेधक विश्वचषक २००३

  • क्रिकेट कॉकटेल

  • क्रिकेट वर्ल्ड कप हायलाईट्स

  • चिरंजीव सचिन

  • दिलखुलास बातचीत क्रिकेटपटूंशी

  • खेलंदाजी

  • बोलंदाजी

  • स्टंप व्हिजन/क्रिकेट गाथा

  • थर्ड अंपायर

  • इंग्लिश ब्रेकफास्ट

  • कथा विश्वचषकाच्या

  • लंडन ऑलिम्पिक

  • पॉवर प्ले

  • स्टंप व्हिजन

  • संवाद लिजंड्सशी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com