IND vs ENG 1st ODI: हे आजवर कधीच घडलं नव्हतं! पहिल्याच सामन्यात हर्षित राणाच्या नावे लज्जास्पद रेकॉर्डची नोंद

Harshit Rana Unwanted Record, IND vs ENG 1st ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यातसुरु असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात हर्षित राणाच्या नावे लज्जास्पद रेकॉर्डची नोंद झाली आहे.
IND vs ENG 1st ODI: हे आजवर कधीच घडलं नव्हतं! पहिल्याच सामन्यात हर्षित राणाच्या नावे लज्जास्पद रेकॉर्डची नोंद
harshit rana twitter
Published On

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारताची तोफ जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. मात्र दिलासादायक बाब अशी की,युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने त्याचा बॅकअप म्हणून संघात प्रवेश केलाय.

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी हर्षितला अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळणार आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याने सुरुवातीलाच २ गडी बाद केले. मात्र त्याच्या एका नकोशा रेकॉर्डची नोंद झालीये. कोणता आहे तो रेकॉर्ड? जाणून घ्या.

IND vs ENG 1st ODI: हे आजवर कधीच घडलं नव्हतं! पहिल्याच सामन्यात हर्षित राणाच्या नावे लज्जास्पद रेकॉर्डची नोंद
Ind Vs Eng 1st ODI : पहिल्या वनडेतून विराट बाहेर की हकालपट्टी? कर्णधार रोहितने दिली माहिती

पदार्पणातच या नकोशा रेकॉर्डची नोंद

हर्षित राणाला आयपीएल गाजवल्यानंतर भारताच्या कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर त्याला टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी वाट पाहावी लागली. मात्र नशिबाने साथ दिली आणि कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून त्याला मैदानात येण्याची संधी मिळाली.

या सामन्यात त्याने ३ गडी बाद करत भारताला विजय मिळवून दिला. दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याला वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

IND vs ENG 1st ODI: हे आजवर कधीच घडलं नव्हतं! पहिल्याच सामन्यात हर्षित राणाच्या नावे लज्जास्पद रेकॉर्डची नोंद
Ind vs Eng: विराट कोहली OUT, जयस्वाल IN; पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाचे ११ धुरंधर

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना, रोहितने सहावे षटक टाकण्याची जबाबदारी दिली. मात्र या षटकात गोलंदाजी करताना त्याने २६ धावा खर्च केल्या. हर्षित राणा गोलंदाजी करत असताना फिल सॉल्ट फलंदाजी करत होता.

या षटकात त्याने ६,४,६,४,० आणि ६ धावा वसूल केल्या. यासह तो पदार्पणाच्या वनडे सामन्यात सर्वात महागडे षटक टाकणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी कुठल्याही भारतीय गोलंदाजाने पदार्पणात गोलंदाजी करताना २६ धावा खर्च केल्या नव्हत्या.

पहिल्या वनडे सामन्यासाठी अशी आहे भारताची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

पहिल्या सामन्यासाठी अशी आहे इंग्लंडची प्लेइंग ११:

बेन डकेट, फिल सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com