Ind vs Eng: विराट कोहली OUT, जयस्वाल IN; पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाचे ११ धुरंधर

India vs England 1st ODI: या सामन्यात इंग्लंडच्या टीमने टॉस जिंकला असून त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुख्य म्हणजे या सामन्यातून विराट कोहलीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
India vs England 1st ODI
India vs England 1st ODIsaam tv
Published On

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे सिरीजमधील पहिला सामना नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही देशांमधील हा सामना दुपारी १:३० वाजता खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यात इंग्लंडच्या टीमने टॉस जिंकला असून त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडिया पहिल्या सामन्यात प्रथम गोलंदाजीसाठी उतरणार आहे.

विराट कोहली बाहेर

नागपूर सामन्यात ओपनर फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांना वनडे सामन्यात डेब्यू करण्याची संधी मिळाली आहे. गौतम गंभीरने यशस्वीला कॅप दिली तर मोहम्मद शमीने हर्षित राणाला कॅप दिली. दुसरीकडे विराट कोहलीला दुखापतीमुळे बाहेर ठेवण्यात आलं आहे. सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या उजव्या गुडघ्यावर पट्टी बांधलेली दिसली.

India vs England 1st ODI
Rohit Sharma: हा काय प्रश्न आहे? पत्रकाराच्या प्रश्नावर संतापला रोहित शर्मा; पाहा हिटमॅनने दिलेलं सडेतोड उत्तर!

टीम इंडियाची प्लेईंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

India vs England 1st ODI
Abhishek Sharma: इंग्लंडच्या गोलंदाजांना फोडून काढणाऱ्या अभिषेक शर्माचा ICC टी20 रँकिंगमध्ये जलवा

इंग्लंडच्या टीमची प्लेईंग ११

बेन डकेट, फिल सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.

India vs England 1st ODI
ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा हादरा, वर्ल्ड चॅम्पियन संघाचा कॅप्टनच होणार बाहेर!

3 सामन्यांची वनडे सिरीज

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे सिरीज आजपासून म्हणजेच ६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. दोन्ही देशांमधील पहिली वनडे आज नागपूरमध्ये खेळवला जातोय. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना ९ फेब्रुवारी रोजी कटकमध्ये खेळला जाईल. तर तिसरा आणि शेवटचा वनडे सामना १२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com