ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा हादरा, वर्ल्ड चॅम्पियन संघाचा कॅप्टनच होणार बाहेर!

Pat Cummins likely to miss ICC Men's Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधीच ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला मोठा हादरा बसला आहे. कर्णधार पॅट कमिन्स हा स्पर्धेत खेळू शकणार नाही, असे संकेत संघाच्या प्रशिक्षकांनी दिले.
team Australia Pat Cummins
team Australia Pat Cumminssaam tv
Published On

ऑस्ट्रेलिया संघाला वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार पॅट कमिन्स आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. पॅट कमिन्स या स्पर्धेतून बाहेर झाला तर, त्याच्या जागी स्टिव्ह स्मिथ किंवा हेड याच्याकडं कर्णधारपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ या स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. अत्यंत महत्वाची अशी स्पर्धा तोंडावर आली असताना, विश्वविजेता ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का मिळाला आहे. पॅट कमिन्स हा या स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. प्रशिक्षक मॅकडोनाल्ड यांनी कमिन्सच्या फिटनेससंदर्भात माहिती दिली आहे. पॅट कमिन्स स्पर्धेबाहेर गेल्यास स्टीव्ह स्मिथ किंवा ट्रॅविस हेड यांच्याकडे नेतृत्व सोपवले जाऊ शकते. याआधी ऑलराउंडर मिचेल मार्श हा पाठीच्या त्रासामुळं स्पर्धेबाहेर झाला होता.

मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मेकडोनाल्ड यांनी कमिन्सच्या तंदुरुस्तीबाबत अपडेट दिले. पॅट कमिन्सनं अद्याप गोलंदाजी करण्यास सुरुवात केलेली नाही. याचाच अर्थ आम्हाला नवीन कर्णधार हवा आहे. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅविस हेड हे दोन खेळाडू आहेत, त्यांच्याशी याबाबत बोलणे सुरू आहे. आम्ही कमिन्ससोबत चर्चा करून संघबांधणी करत आहोत. हेड आणि स्मिथ असे दोन खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे आम्ही नेतृत्व सोपवू शकतो, असे ते म्हणाले.

स्टीव्ह स्मिथने अलीकडेच झालेल्या कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलीय. पॅट कमिन्स श्रीलंका कसोटी मालिकेतही खेळला नाही. आता तो दुखापतीनं ग्रस्त आहे. त्यानं अद्याप सरावही सुरू केला नाही. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान त्याची दुखापत आणखी वाढली. दुसरीकडे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टिव्ह स्मिथनं संघाची धुरा सांभाळली होती.

team Australia Pat Cummins
भारताच्या या ३ खेळाडूंकडे दुसऱ्यांदा Champions Trophy जिंकण्याची संधी! २०१३ मध्ये गाजवलेलं मैदान

हेजलवूडबाबतही साशंकता

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज हेजलवूड दुखापतीमुळं मेलबर्न आणि सिडनी कसोटी खेळू शकला नव्हता. श्रीलंका दौऱ्यावरील संघातही त्याचा समावेश नाही. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या १५ सदस्यीय प्राथमिक संघात त्याला संधी देण्यात आली आहे. पण या स्पर्धेत तो खेळणार की नाही याबाबत शंका आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १२ फेब्रुवारीपर्यंत अंतिम संघ जाहीर करायचा आहे.

team Australia Pat Cummins
Champions Trophy: भारत- पाकिस्तान सामन्याची तिकिटे काही मिनिटात Sold Out! तिकिटांची किंमत किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com