ravindra jadeja twitter
Sports

IND vs ENG 1st ODI: रविंद्र जडेजाने रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये जेम्स अँडरसनला सोडलं मागे

Ravindra Jadeja Breaks James Anderson Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात रविंद्र जडेजाने मोठ्या रेकॉर्डमध्ये जेम्स अँडरसनला मागे सोडलं आहे.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना नागपूरच्याव विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला.

भारताक़ून गोलंदाजी करताना डावखुऱ्या हाताचा फिरकीपटू रविंद्र जडेजाच्या फिरकीवर इंग्लंडचे फलंदाज नागिण डान्स करताना दिसून आले. या सामन्यात जडेजाने इंग्लंडच्या ३ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. यासह जडेजाने इंग्लंडचा माजी गोलंदाज जेम्स अँडरसनचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

जडेजाने मोडला अँडरसनचा रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत जडेजाने शानदार गोलंदाजी केली. त्याने ९ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने २६ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. असा कारनामा करणारा तो पाचवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी आर अश्विन, अनिल कुंबळे, हरभजन सिंग आणि कपिल देव यांनी हा रेकॉर्ड केला आहे.

आणखी एका रेकॉर्डची नोंद

यासह रविंद्र जडेजाच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. जडेजा भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या वनडे मालिकांमध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. जडेजाने इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळताना ४१ गडी बाद केले आहेत. या रेकॉर्डमध्ये त्याने जेम्स अँडरसनला मागे सोडलं आहे. अँडरसनच्या नावे वनडे मालिकेत ४० गडी बाद करण्याची नोंद आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रविंद्र जडेजा अव्वल स्थानी आहे. जडेजाच्या नावे ४१ गडी बाद करण्याची नोंद आहे. तर अँडरसन दुसऱ्या स्थानी आहे. त्याने ४० गडी बाद केले आहेत. तर इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज अँड्र्यू फ्लिंटॉप ३७ गडी बाद करण्यासह तिसऱ्या स्थानी आहे.

तर हरभजन सिंग ३६ गडी बाद करण्यासह तिसऱ्या स्थानी आहे. जवागल श्रीनाथ आणि आर अश्विन यांच्या नावे प्रत्येकी ३५-३५ गडी बाद करण्याची नोंद आहे. जडेजाकडे या रेकॉर्डमध्ये आणखी पुढे जाण्याची संधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT