IND vs ENG: नॉर्मल वाटलोय का? ४४५ दिवसांनंतर कमबॅक; शमीने रॉकेट बॉल टाकून मिडल स्टम्प उडवला- VIDEO
mohammed shamitwitter

IND vs ENG: नॉर्मल वाटलोय का? ४४५ दिवसांनंतर कमबॅक; शमीने रॉकेट बॉल टाकून मिडल स्टम्प उडवला- VIDEO

Mohammed Shami, India vs England 1st ODI: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ४४५ दिवसांनंतर वनडे क्रिकेटमध्ये कमबॅक केलंय.
Published on

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

गोलंदाजीसाठी आलेल्या भारतीय गोलंदाजांनीही इंग्लंडच्या फलंदाजांना एका पाठोपाठ एकम मोठे धक्के दिले. दरम्यान शमीनेही वनडे क्रिकेटमध्ये कमबॅक करताना शानदार गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

IND vs ENG: नॉर्मल वाटलोय का? ४४५ दिवसांनंतर कमबॅक; शमीने रॉकेट बॉल टाकून मिडल स्टम्प उडवला- VIDEO
Ind Vs Eng 1st ODI : पहिल्या वनडेतून विराट बाहेर की हकालपट्टी? कर्णधार रोहितने दिली माहिती

शमीचं दमदार कमबॅक

जसप्रीत बुमरारहच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह भारतीय वेगवान आक्रमणातील प्रमुख शिलेदार असणार आहे. वनडे वर्ल्डकप गाजवल्यानंतर शमीला क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागलं होतं. तब्बल ४४५ दिवस तो वनडे क्रिकेटपासून दूर होता. अखेर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. दरम्यान कमबॅक करताच त्याने इंग्लंडच्या फलंदाजाची दांडी गुल केली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

शमी १४ महिन्यांपासून वनडे क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे सुरुवातीला त्याला सुर गवसला नाही. मात्र जेव्हा तो रिदममध्ये आला त्यावेळी त्याने इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवून ठेवलं. तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना ४० वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद शमी गोलंदाजीला आला.

IND vs ENG: नॉर्मल वाटलोय का? ४४५ दिवसांनंतर कमबॅक; शमीने रॉकेट बॉल टाकून मिडल स्टम्प उडवला- VIDEO
IND vs ENG 1st ODI: हे आजवर कधीच घडलं नव्हतं! पहिल्याच सामन्यात हर्षित राणाच्या नावे लज्जास्पद रेकॉर्डची नोंद

त्यावेळी इंग्लंडकडून ब्रायडन कर्स फलंदाजी करत होता. शमीने या षटकातील पाचवा चेंडू मधल्या यष्टीच्या दिशेने अचूक लाईन आणि लेंथवर टाकला. या चेंडूवर कर्सने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न हुकला. चेंडू सरळ जाऊन यष्टीला धडकला. यासह कर्स १८ चेंडूत १० धावांची खेळी करुन माघारी परतला. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

पहिल्या वनडे सामन्यासाठी अशी आहे भारताची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

पहिल्या सामन्यासाठी अशी आहे इंग्लंडची प्लेइंग ११:

बेन डकेट, फिल सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com