indian cricket team twitter
Sports

IND vs BAN,Weather Prediction: IND vs BAN सामन्याआधीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! समोर आली मोठी अपडेट

India vs Bangladesh Super 8 Weather Prediction: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुपर ८ फेरीतील सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये पावसाने अडथळा निर्माण केला आहे. आज सुपर ८ फेरीत भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यातही पाऊस महत्वाची भूमिका बजाऊ शकतो. हा सामना अँटिग्वाच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान सामना पावसामुळे रद्द झाल्यास कसा लावला जाईल निकाल? जाणून घ्या.

पावसामुळे सामना रद्द होणार?

भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या सामन्यावेळी पाऊस हजेरी लावणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होणार आहे. तर स्थानिक वेळेनुसार हा सामना सकाळी १०:३० वाजता सुरु होणार आहे. accuweather ने दिलेल्या माहितीनुसार, सामन्यावेळी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुपारच्या वेळी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो.

सामना पावसामुळे रद्द झाला तर?

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुणांवर समाधान मानावं लागेल. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांच्या टेन्शनमध्ये वाढ होणार आहे. कारण भारतीय संघाचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. तर बांगलादेश संघाचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. सामना रद्द झाल्यास पुढील सामना दोन्ही संघांसाठी सेमीफायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे.

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत केलं आहे. आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ सुपर सेमीफायनलच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. ग्रुप १ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे.

तर अफगाणिस्तानचा संघ तिसऱ्या आणि बांगलादेशचा संघ चौथ्या स्थानी आहे. भारतीय संघाने आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवला आणि २३ जून रोजी होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला पराभूत केलं तर भारतीय संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. यासह भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपुरात सकल ओबीसी समाजाचा उद्या महामोर्चा निघणार

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

Solapur : शेताच्या बांधावरून वाद; शेतकऱ्याने रागातून २०० केळीची झाडे केली उध्वस्त

SCROLL FOR NEXT